अमरावती

शेतकऱ्यांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद; शिरखेड पोलिसांची कार्यवाही  

नेरपिंगळाई प्रतिनिधी: –

अमरावती ग्रामिण जिल्हयाचे पोलीस स्टेशन शिरखेड हद्दीतील ग्राम निभीं येथे दि. १५/०३/२०२५ रोजी कापुस विक्री वरून शेतकरी व कापुस खरेदी करणारे व्यापारी यांच्यात कापुस मोजमाप करण्याचे कारणावरून वाद सुरू असल्याची माहीती प्राप्त झाल्याने श्री. सचिन लुले, ठाणेदार, पो.स्टे. शिरखेड व पोलीस अमंलदार हे त्वरीत घटनास्थळी पोहचुन सविस्तर घटना जाणुन घेतली असता माहीती मिळाली की, शेतक-यांकडुन कापुस खरेदी करण्या करिता ८-१० व्यापारी हे एजंट योगश वाठोडकर, रा. सालोरा खुर्द, जि. अमरावती यांचे मार्फतीने ग्राम निभी येथे आले होते.कापुस खरेदी-विक्री चा व्यवहार सुरू असतांना कापुस ईलेक्ट्रानिक्स वजन काट्यावर मोजमाप करून देण्यात येत होते. त्यावेळी काही शेतक-यांना वजन काट्या बावत शंका निर्माण झाली वरून वाद सुरू असल्याचे निदर्शनास आले.पोलीसांनी घटनास्थळावरच शेतक-यांनी विकलेल्या कापसाचा आकडा व प्रत्यक्ष व्यापारी यांचे टाटा ४०७ वाहनात असलेल्या कापसाची तपासणी केली असता तफावत दिसुन आली. शेतक-यांची मोजमाप दरम्यान फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच पोलीस पथकाने उपस्थित व्यापारी १) तनविर अहमद मो. जमीर, २) राजीक खान नुर खान,वय ४०, ३) जाफर वेग जमीर वेग, वय ३०, रा. नायगांव ४) मो. तजकीर मो. जमीर, ५) मनोहर श्रीराम भवाने, वय ५६, सर्व रा. बार्शीटाकळी, जि. अकोला ६) योगश वाठोडकर, रा. सालोरा खुर्द, जि. अमरावती यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांचे इतर साथीदार सदर वादा दरम्यान गर्दीचा फायदा घेवुन पळून गेले असल्याचे व त्यांचे जवळ सदर ईलेक्टानिक वजनकाटयाचे रिमोट असुन त्याव्दारे ते शेतक-यांची कापुस खरेदी दरम्यान फसवणुक करित असल्याचे सांगीतले.सदर घटनेचे अनुषंगाने तक्रारदार श्री. शुभम नंदकुमार साबळे, वय ३०, रा. निर्मा यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषगांने आरोपी विरूध्द कलम ३१८ (४), ३ (५) भा.न्या.सं. अन्वये पो.स्टे. शिरखेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीतांचे ताब्यातुन ईलेक्ट्रानिक्स वजन काटा, टाटा ४०७ क्रं. एम.एच.४२/ए.एफ. ०२४८, तसेच १२०८ कि.ग्र. कापुस, ०६ मोबाईल, नगदी २,५०,०००/- रू जप्त करण्यात आले आहे. आरोपी दि. १९/३/२०२५ पावेतो पोलीस कोठडीत असुन त्यांचे इतर फरार साथीदारांचा शोध व तपास शिरखेड पोलीस करित आहेत.सदरची कार्यवाही मा. श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अम.ग्रा., श्री. पंकज कुमावत, अपर पोलीस अधिक्षक, अम.ग्रा., श्री. संतोष खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, मोशी यांचे मार्गदर्शनात श्री. सचिन लुले,ठाणेदार पो.स्टे. शिरखेड, यांचे नेतृत्वात स.पो.नि. राहुल गवई, पो.उप.नि. संजय ठाकरे, पोलीस अमंलदार सचिन भाकरे, कळसकर, मेटकर, वैभव घोगरे, मधुर कापडे, संतोष झाडे, स्वप्नील डहाके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!