पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि पुण्याला पळून गेला…
बेंगळुर प्रतिनिधी : बेंगळुरूच्या हुलीमायू पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील दोड्डकम्मनहल्ली येथील एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला. महिलेची हत्या तिच्या पतीनेच केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर आरोपी पतीने प्रथम पतीची अत्यंत निघृण हत्या केली, त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले, त्यानंतर फ्लॅटला कुलूप लावून पुण्याला पळून गेला. पोलिस उपायुक्त सारा फातिमा यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पती-पत्नी महाराष्ट्राचे रहिवासी होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी खेडकर असे मृत महिलेचे नाव असून राकेश राजेंद्र खेडकर असे आरोपी पतीचे नाव आहे. दोघेही पुण्याचे रहिवासी आहेत. पोलिस उपायुक्त सारा फातिमा यांनी सांगितले की, महिला आणि तिचा पती गेल्या महिन्यात बंगळुरूला शिफ्ट झाले होते. त्यांनी सांगितले की गौरीने मास मीडियामध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. तिचा नवरा एका खासगी कंपनीत काम करतो. यावेळी तो घरून काम करत होता.
घरमालकाने पोलिसांना माहिती दिली
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरमालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरलेला असून तिच्या शरीरावर चाकूच्या जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर फॉरेन्सिक तज्ञांना बोलावण्यात आले आणि त्यांनी घटनास्थळावरून नमुने गोळा केले. खून केल्यानंतर राकेश राजेंद्र खेडकर पुण्याला पळून गेला होता, तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त सारा फातिमा यांनी सांगितले की, आरोपीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले असून त्याला बंगळुरूला आणले जात आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हत्येमागील कारण समजेल.
पत्नीच्या हत्येनंतर सासू, सासऱ्याला फोन केला
त्याचवेळी, काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, खून केल्यानंतर आरोपी पती राकेश राजेंद्र यानेही सासरच्या लोकांना फोन करून फोनवर सांगितले होते की, त्याने पत्नीची हत्या केली असून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये आहे. त्याचवेळी आरोपीने आपल्या पत्नीच्या हत्येबाबत सासरच्या मंडळींना माहिती दिल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया विचारली असता, सारा फातिमा म्हणाली की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या तपशीलांची खातरजमा केल्यानंतरच काही सांगता येईल.