खामगाव शेगाव रोड वर तिहेरी भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…
खामगाव प्रतिनिधी:-
आज सकाळी खामगाव ते शेगाव रोड वर एस टी बस, बोलेरो आणि लक्झरी बस चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून 25 जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघात पुणे परतवाडा बस ला बोलेरो ने मागून धडक दिली नंतर मागून येणाऱ्या लक्झरी बस ने दोन्ही वाहनांना धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ते शेगाव रोडवर जयपुर लांडे फाटा समोर हा विचित्र अपघात झाला आहे. पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला मागून आधी एका चारचाकी वाहनाने धडक दिली, त्यानतंर एका खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. या तिहेरी अपघातात गाड्यांचेही बरेच नुकसान झाले. आज पहाटे पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 लोकं जखमी झालेत. त्यापैकी 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी तिहेरी अपघातामुळे मोठी खळबळ माजली असून अनेकांच्या जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ खामगाव शहर पो चौरस स्टे चे ठाणेदार राजेश पवार हे आपल्या कर्मचाऱ्यासमवेत पोहचले तसेच स्थानिक तहसीलदार सुनील पाटील ही पोहचले. वाहनांमध्ये अडकलेल्या रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मधील गंभीर रुग्णांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. सात लोक मृत्युमुखी पडले आहे