अंबाजोगाई

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान राजकिशोर मोदी हे सहकाऱ्यांसह मंडळांना भेटून गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले

 

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या बप्पाचे अकरा दिवसानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी जड अंतःकरनाणे ढोलताशाच्या गजरात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकी दरम्यान सर्व गणेशमंडळाच्या मिरवणुकीत उत्साहात स्वतः सहभागी होत प्रत्येक गणेश मंडळाच्या सर्व अध्यक्षांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला. यावेळी राजकिशोर मोदी यांच्या सोबत मनोज लखेरा, महादेव आदमाणे, दिनेश भराडीया, धम्मा सरवदे, सुनील वाघाळकर, कचरूलाल सारडा, सुधाकर टेकाळे, चंद्रकांत गायकवाड, अकबर पठाण, विजय रापतवार,मुनिर शहा, कैलास कांबळे, दत्ता सरवदे, काझी खयामोद्दीन, खलील जाफरी, रफीक गवळी, रशीद भाई, दत्ता हिरवे, जावेद गवळी, सय्यद ताहेर, विशाल पोटभरे, सुदाम देवकर, शाकेर काझी, मतीन जरगर, अजीम जरगर, आकाश कऱ्हाड, महेबूब गवळी, शरद काळे, संतोष चिमणे, रोशन लाड, अस्लम शेख यांच्यासह अनेक सहकारी सहभागी झाले होते.
जवळपास एक महिन्यापासून शहरातील सर्व गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी व त्यांच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली होती. प्रत्येक मंडळांनी आपापल्या परीने मंडळात विविध सामाजिक ,धार्मिक देखावे सादर केली होती. मात्र अनंत चतुर्थीच्या दिवशी परंपरेनुसार आपल्या लाडक्या बप्पाला निरोप द्यावाच लागतो. निरोप देतांना प्रत्येक गणेशमंडळ जड अंतकरणाने ढोलताशाच्या गजरात, लेझीम, टिपऱ्या व विविध पारंपरिक वाद्याच्या निनादात तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करून बाप्पाला निरोप देत होते. बाप्पाला निरोप देतांना अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे आपल्या सहकाऱ्यांसोबत जातीने मिरवणुकीत फिरून प्रत्येक गणेशमंडळाच्या अध्यक्षांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत होते. मंडळाच्या सन्मानामुळे त्या गणेश मंडळात उत्साह भरण्याचे काम होत होते. गणेश मंडळानी देखील राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात राजकिशोर मोदी, संकेत मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध मंडळांना भेटी देऊन मंडळांच्या बप्पांची मनोभावे पूजा करून आरती केली. यामध्ये प्रामुख्याने दीपक गणेश मंडळ गुरुवार पेठ, वीर गणेश मंडळ, सातपुते गल्ली, राजे शिवछत्रपती गणेश मंडळ गांधी नगर, नवयुवक गणेश मंडळ मंगळवार पेठ, छत्रपती गणेश मंडळ हनुमान नगर, विघ्नहर्ता गणेश मंडळ माळी नगर, साई गणेश मंडळ अण्णाभाऊ साठे चौक, पुत्तरेश्वर गणेश मंडळ जैन गल्ली,जय मल्हार गणेश मंडळ धनगर गल्ली, हौसिंग सोसायटी गणेश मंडळ, पाताळेश्वर गणेश मंडळ ढोर गल्ली, ज्ञानदीप अकादमी लोखंडी सावरगाव गणेश मंडळ, बेलदार वस्ती क्रांती नगर गणेश मंडळ यासह विविध गणेश मंडळांचा समावेश होता. गणेशोत्सवादारम्यान तसेच बप्पाच्या विसर्जन दरम्यान राजकिशोर मोदी यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळांना भेटी देऊन त्यांच्या अध्यक्षांचा सन्मान करत मंडळात उत्साह वाढवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!