संजय राऊत खोटं बोलतात हे पुन्हा सिद्ध झाले..!कोण खरे, कोण खोटे आता जनतेनेच काय तो निर्णय घ्यावा – भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
संजय राऊत नांवाचे सद्ग्रहस्थ रोज उठुन सकाळी सत्ताधार्यांवर बेताल बडबड व खोटे आरोप करीत नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण होतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं बोलणं साफ खोटं असतं. केवळ रेटुन बोलल्यामुळे माध्यमाद्वारे समाजापर्यंत जावुन पोहोचतं. महायुतीच्या सत्ताधार्यांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य देवु नका. कारण, हे खोटारडे सद्ग्रहस्थ असल्याचे अनेकदा जाहिर केले. मात्र माध्यम प्रभावामुळे लोकांनाही खरं वाटायचं. काल मेघा किरीट सोमय्या यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात माझगाव न्यायालयाने राऊतांचे आरोप खोटे ठरवत त्यांना पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली. तेव्हा कुठं आता सर्वांनाच ही व्यक्ती खोटे बोलते याची प्रचिती आली. न्यायदेवतेच्या शिक्कामोर्तबानंतर संजय राऊतांच्या अंगी खर्या अर्थाने रोज माध्यमांच्या समोर येवुन आता बेताल बडबड करण्याची नैतिकता राहिलीच नसल्याचा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रवक्ते कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, मा.माझगाव कोर्टाने अब्रुनुकसानीच्या दाव्यात अर्थात मेघा सोमय्या प्रकरणात केलेले खोटे आरोप चुकीचे असल्याचं निरीक्षण करत त्यांना पंधरा दिवसाची शिक्षा ठोठावली. मुळात त्यांचं असलेले प्रकरण काय होतं ? यापेक्षा त्यांना झालेली पंधरा दिवसाची शिक्षा ही राऊतांचा खोटारडेपणा सिद्ध करणारी म्हणावी लागेल. मागच्या अनेक वर्षांपासून रोज उठायचं आणि सकाळी माध्यमांसमोर बेताल बडबड करत केंद्र आणि राज्यातील सत्ताधार्यांवर खोटे आरोप करत संभ्रम निर्माण करायचा. सुरूवातीला त्यांच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसला असेल. मात्र कालांतराने लोकांनी देखील हा माणुस खोटा आहे लक्षात घेवुन त्यांच्या बेताल बडबडीकडे दुर्लक्ष्य केलं. अनेक असे आहेत की टिव्हीवर संजय राऊतांचा चेहरा दिसताच टिव्ही बंद करून टाकतात. अशा परिस्थितीत काल त्यांच्या विरोधात आलेला निकाल हा खर्या अर्थाने सद्ग्रहस्थांचा चेहरा साफ खोटा हे न्यायदेवतेनेच सिद्ध करून दाखवलं. वास्तविक पहाता या महाशयांनी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर न्याय व्यवस्थेवरच कठोर शब्दांत टिका करत रखेली सारखी न्यायव्यवस्था झाल्याचा आरोपही केला. देशात आजवर कुणीही न्यायव्यवस्थेच्या विरोधात ब्र शब्द काढत नाही. मात्र मी म्हणजेच न्यायालय या आविर्भावात राजकिय भुमिकेत काम करणार्या राऊतांचा खोटारडेपणा न्यायालयानेच जेव्हा उघडा पाडला तेव्हा खर्या अर्थाने आता त्यांच्यात रोजची बडबड करण्यात कुठल्याही प्रकारची नैतिकता राहिली नाही हे तितकंच खरं. न्यायव्यवस्था कुणाचीही बटिक नसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन ठेवलेल्या घटनेनुसार या देशात व्यवस्था आणि न्यायव्यवस्था मागील अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. न्यायदेवतेने हे सद्ग्रहस्थ साफ खोटं बोलतात अशा प्रकारचं निरीक्षण दिल्यानंतर खर्या अर्थाने संजय राऊतांच्या बेताल बडबडीचे बिंग फुटले. राज्यातील सर्वसामान्य जनतेचा आता त्यांच्या कुठल्याही बोलण्यावर तथा बडबडीवर विश्वास राहणार नाही हे नक्कीच. खरी नैतिकता त्यांच्यात असती तर संविधानावर बसलेल्या राज्यसभा सदस्याचा देखील त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. कारण, संसदेचं सर्वोच्च सभागृह म्हणुन ज्याला पहायला जातं त्याच सभागृहाचा एक सदस्य एवढा खोटा बोलु शकतो सामाजिकदृष्ट्या चिंतेचा विषय असुन ज्यांच्या खोटं बोलण्यावर न्यायदेवतेने मारलेला शिक्का कदाचित त्यांनी तर आपल्या खासदारपदाचा राजीनामाच द्यायला हवा, या शब्दांत भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी खरमरीत शब्दांत टिका केली.
=======================
*नोट – बातमी सोबत फोटो.*
=======================