अंबाजोगाई

महात्मा गांधी जयंतीनिमित्त समाधान मानसोपचार रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन* *_नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी – आयोजक डॉ.राजेश इंगोले यांची माहिती.


अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शहरातील समाधान मानसोपचार रूग्णालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन समाधान रूग्णालय येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनची सांस्कृतिक समिती, इनरव्हिल क्लब, अंबाजोगाई व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते अशी माहिती समाधान मानसोपचार रूग्णालयाचे संचालक तथा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी दिली.

या शिबिरामध्ये डॉ.योगेश मुळे, डॉ.ऐश्वर्या चव्हाण, डॉ.जिगीषा मुळे, डॉ.प्रज्ञा किनगावकर, डॉ.इम्रान पटेल, डॉ.कृष्णकुमार गित्ते, डॉ.बळीराम मुंडे, डॉ.जुबेर शेख, डॉ.प्रियंका सोळंके, डॉ.विजय लाड, डॉ.नितीन पोतदार आदींनी नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व योग्य निदान करून त्यांच्यावर औषधोपचार केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.राजेश इंगोले तर उदघाटक म्हणून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे या होत्या. या कार्यक्रमात स्वच्छता विभागप्रमुख अनंत वेडे आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष प्रा.सुरेखा सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त सेवा पंधरवडा सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्त सर्व शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची धुरा डॉ.राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर्सनी घेतली. ही अत्यंत सकारात्मक बाब असून ही मानवतेची जुळलेली नाळ, ऋणानुबंध पुढे भविष्यात असेच कार्यान्वित राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.राजेश इंगोले यांनी नगरपरिषद अंबाजोगाई येथील कर्मचाऱ्यांच्या मोफत आरोग्य तपासणीचे हे सलग पाचवे वर्ष आहे. कोविड काळापासून अविरतपणे दरवर्षी सातत्याने हे शिबीर आम्ही घेत आहोत. ही माहिती देत स्वच्छता कर्मचारी व आरोग्यसेवा हे एकमेकांशी संबंधित घटक आहेत. बिना स्वच्छतेचे आरोग्य असूच शकत नाही. त्यामुळे देशाच्या स्वच्छतेचे शिवधनुष्य लिलया पेलणारे स्वच्छता कर्मचारी हे आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे आरोग्य निरोगी राहावे या करिता सामाजिक जबाबदारी म्हणून हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जी सेवा या देशाला दिली. त्याचे मोल आणि उपकार कुणीही फेडू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा संघटनेचा हा अल्पसा प्रयत्न आहे. असे मनोगत व्यक्त करून स्वच्छता कर्मचारी समाजाची करीत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इनरव्हील क्लब अंबाजोगाईच्या अध्यक्षा प्रा.सुरेखा शिरसट खंडाळे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ.प्रज्ञा इंगोले यांनी मानले. यावेळी इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे परीक्षण करणाऱ्या परीक्षक प्रा.शंकर सिनगारे, अभय खोगरे, शैलेश पुराणिक, प्रा.संपदा कुलकर्णी, प्रा.डॉ.विनोद निकम तसेच अंबाजोगाई नगरपालिका ही स्वच्छता मानांकनात राज्यात पहिली आल्याबद्दल स्वच्छता विभागप्रमुख अनंत वेडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.‌ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाधान रूग्णालयाचे मयूर गायकवाड, गोविंद गायकवाड, शेख वाजेद, सचिन साळवे, अजित आव्हाड अर्जुन शिंदे, धम्मराज सिताप, गौतम घनगाव, मनोज इंगोले, अक्षय इंगोले, विशाल अंबाड यांनी पुढाकार घेतला होता.

=======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!