स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात मतदान जनजागृती रॅली
अंबाजोगाई(प्रतिनिधी)
योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ निमित्त्याने रॅली काढण्यात आली रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. थारकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यां समवेत शहरातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. गटशिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार, नांदुरकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे अभियान राबवण्यात येत आहे.
मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा.सविता बुरांडे यांनी प्रास्तविक करून आभार मानले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.जितेंद्र देशपांडे,पर्यवेक्षक जवळगावकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.