*पुणे येथे इंडियन मेडिकल असोसिएशनचा ‘कलादर्पण 20024’ राज्यस्तरीय सांस्कृतिक सोहळा उत्साहात व जल्लोषात साजरा.* *- सांस्कृतिक समितीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांची माहिती*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे पारितोषिक वितरण व गुणदर्शन कार्यक्रम नुकताच पुणे येथे संपन्न झाल्याची माहिती सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष तथा अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी दिली.
या कार्यक्रमास संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.दिनेश ठाकरे,नियोजित अध्यक्ष डॉ संतोष कदम ,सचिव डॉ सौरभ संजनवाला,कोषाध्यक्ष डॉ विक्रांत देसाई, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ.रंजन संचेती, डाॅ.राजेश इंगोले अध्यक्ष, सांस्कृतिक समिती महाराष्ट्र राज्य, डॉ संजय पाटील,डॉ नवरंगे, सचिव डॉ वीरेंद्र ओस्टवाल, उपाध्यक्ष डॉ.वैजयंती पटवर्धन, सहसचिव डॉ मीनाक्षी कुलकर्णी, डॉ संतोष कुलकर्णी, डॉ गीतांजली शर्मा,डॉ तुकाराम मुंढे, डॉ मोहिनी गानू, डॉ वृंदा कुलकर्णी, डॉ राजेश्री सावंत, डॉ पल्लवी दोडके, डॉ प्रज्ञा किनगावकर , डॉ राजन जोशी ,डॉ माया भालेराव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सौरभ संजनवाला, डॉ.राजेश इंगोले,डॉ संतोष कदम, डॉ.संजय पाटील,डॉ वैजयंती पटवर्धन, डॉ मीनाक्षी कुलकर्णी, डॉ.संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी आय एम ए महाराष्ट्र तर्फे सलग दुसऱ्या वर्षी कलादर्पण 2024 हा कलाउत्सव महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स साठी आयोजित केला आणि व्यस्त असणाऱ्या डॉक्टर्सनी या महोत्सवात प्रचंड संख्येने सहभागी होऊन याचा आनंद घेतला. महाराष्ट्रातील डॉक्टर्ससाठी या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात ताणतणाव विसरून इतक्या प्रचंड संख्येने डॉक्टर्स सहभागी झाले हेच या आयोजित कार्यक्रमाचे फलीत आणि यश असल्याचे सांगितले. कला ही माणसाच्या जगण्यात उतरली पाहिजे आणि जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी प्रत्येकाने एखादी कला जोपासली पाहिजे असे मत व्यक्त केले. तर संघटनेचे राज्याचे सचिव डॉ.सौरभ संजनवाला यांनी इंडीयन मेडीकल असोसिएशन सांस्कृतिक समिती तर्फे आयोजित या गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, नृत्यस्पर्धा,रिल्स स्पर्धा , काव्य लेखन स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी केल्याबद्दल सांस्कृतिक समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांचे अभिनंदन करीत डॉ.राजेश इंगोले यांनी या पुढील काळात सुद्धा अशा बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर्षी घेण्यात आलेल्या या स्पर्धा न भूतो न भविष्यती अशा प्रकारे आयोजित करण्यात आल्या आहेत असे गौरवोद्गार काढत आयएमए ही संघटना खऱ्या अर्थाने डॉक्टर्सच्या सुखदुःखात सदैव सहभागी असते असे प्रतिपादन केले. पुणे स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ राजन संचेती यांनी डॉ राजेश इंगोले हे उत्साहाचं अजब रसायन आहे जे कार्य हाती घेतात ते केवळ तडीस नेतात अस नाही तर पूर्ण ताकतीने स्वतःला त्यात झोकून देऊन त्या कार्याला नवीन आयाम देतात. कलादर्पण 2024 वर्ष दुसरे पुणे येथे आयोजित करण्याचे सौभाग्य पुणे शाखेला मिळाले आहे त्याबद्दल संघटनेचे आभार मानले. डॉ संतोष कदम यांनी डॉक्टर्स हे धरती वरील देव मानले जातात पण, वस्तुस्थितीत डॉक्टर्स ही सर्वसामान्य व्यक्ती असते. दैनंदिन ताणतणाव, प्रश्न, समस्या त्यालाही असतात त्यामुळे त्यांनाही या ताणतणावापासून मुक्ती हवी असते आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून आणि समोर उपस्थित डॉक्टर्सची संख्या पाहता डॉ.राजेश इंगोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा हेतू साध्य केल्याचे दिसून येते. उपस्थित डॉक्टर्स आपआपल्या विषयांत तर तज्ज्ञ आहेतच पण, त्यांनी यावेळी ज्या कला सादर केल्या आहेत,त्यामुळे आम्हीही अचंबित झालो असल्याची प्रांजळ कबुली देत डॉक्टर्स ही उत्तम गायक, संगीतकार, फोटोग्राफर, चित्रकार, उत्कृष्ट नर्तक ,कवी कवयित्री ,रिल्स स्टार असू शकतात हे या कलादर्पण 2024 सांस्कृतिक सोहळ्याने दाखवून दिल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सूत्रसंचालन डॉ. गीतांजली शर्मा तर आभार प्रदर्शन डॉ राजन जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतीक समितीच्या सर्व मध्यवर्ती कार्यकारणीने व पुणे स्थानिक शाखेच्या पदाधिकाऱयांनी परिश्रमघेतले
.