अंबाजोगाई

महाविकास आघाडीचे उमेदवार मा. राजेसाहेब देशमुख यांना आदिवासी कोळी समाजाचा जाहीर पाठिंबा

अंबाजोगाई प्रतिनिधी:-
महाविकास आघाडीच्या परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपणांस आमचा संपूर्ण समाज एकमताने जाहीर पाठिंबा देत आहे. आज, दिनांक ०७/११/२०२४ रोजी अनुसूचित जाती-जमाती संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि कोळी राष्ट्रसंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बळीराजे वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत समाजाच्या हितासाठी व सन्मानासाठी एकत्र येऊन समाजातील प्रतिनिधींनी सर्वानुमते आपणास समर्थन देण्याचा ठराव पारित केला. गेल्या अनेक वर्षांत समाजाला केवळ खोटी आश्वासने मिळाली, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी वारंवार समाजाला फसवले गेले. भुलथापांनी समाजाला दिशाभूल केली, मात्र आता आम्ही ठरविले आहे की, आमच्या समाजाचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला, म्हणजेच आपणास, संपूर्ण समर्थन द्यायचे आहे.
आम्ही सर्वांनी ठरवले आहे की, “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हावर बटण दाबून मोठ्या बहुमताने आपल्याला विजयी करायचे आहे. समाजाचा विश्वास आणि एकजुटीचे प्रतीक म्हणून आपणांस संपूर्ण पाठिंबा दिला जात आहे.
आम्हाला विश्वास आहे की आपण आमच्या अपेक्षांची पूर्तता कराल आणि समाजाच्या समस्यांचे निराकरण करून खऱ्या अर्थाने समाजाची सेवा कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!