अंबाजोगाईच्या गोदामातील धान्याला पाय फुटले–गरीबांना मिळणारे मोफत धान्य कोणाच्या घशात–पन्नास किलोच्या तांदळाच्या पोत्यात निघाले चाळीस किलो
अंबाजोगाई – येथील शासकीय गोदामात आलेल्या गहू व तांदळाला कट्ट्यागणीस दहा किलोला पाय फुटल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाला कोणाच्या पाठबळ आहे. हा संशय व्यक्त केला जात आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या दिलेल्या धान्यातून पोत्यातून माल कसा गायब होतो. याकडे
तहसीलदार व उपजिल्हाधिकारी लक्ष देणार का? याकडे लक्ष लागले आहे.
शासनाच्या वतीने गरीब नागरिकांना मोफत गहू व तांदळाचे वाटप कर्ते परंतु गरीबासाठी आलेले धान्य पोत्यातून गायब होवू लागले आहे. अंबाजोगाईच्या गोदाम रक्षक म्हणून एस.आर.बलुतकर यांची ऑर्डर झालेली असतानाही तहसीलदाराच्या आशिर्वादाने दुसर्याच व्यक्तीला या गोदामात बसविले आहे. त्यामुळे या गोदामात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. शासनाकडून पन्नास किलोच्या पोत्यामधील दहा किलो धान्य गायब होत असून हे धान्य कोणाच्या घशात जात आहे. हा संशयाचा विषय आहे. शासकिय धान्य घोटाळ्यात बीड पासून स्थानिक पातळीपर्यंत यंत्रणा बरबटली असून याकडे कोणी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. शासनाकडून नियमाप्रमाणे
एका पोत्यामध्ये पन्नास किलो धान्य व पाचशे ग्रॅम पोत्याचे वजन क्रम बाह्य आहे. परंतु अंबाजोगाईच्या गोदामातून चाळीस किलो धान्य व पोत्याचे 240 या प्रमाणे धान्य स्वस्त धान्य दुकानदाराला वाटप होत आहे. आज शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्याती येल्डा येथील ग्रा.प.कार्यालया अंतर्गत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला दिलेले धान्य पोत्यासह काट्यावर मोजमाप केले असता. चाळीस किलो धान्य निघाले. उर्वरीत दहा किलो धान्य कोणाच्या घशात गोदाम रक्षक घालित आहे. याची चौकशी करणे गरजेचे आहे. अंबाजोगाईतील सावळ्या गोंधळाकडे जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.