अंबाजोगाई

ई.व्ही.एम मशीन बंद करून राज्यात ब्यालेट पेपरवर फेर निवडणूका घ्याव्यात – माजी आमदार पृथ्वीराज साठे

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- नुकत्याच महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीला त्यांच्या अपेक्षित निकालापेक्षा अधिकचे यश मिळाले आहे. मात्र बऱ्याच ठिकाणचे निकाल हे संशयास्पद असल्याचे आढळून आले आहेत त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणांहून फेरमतमोजनी तथा फेरमतदान घेण्याची मागणी होऊ लागली आहे. अशीच ईव्हीएम मशीन बंद करून ब्यालेट पेपर वर फेरमतदान घेण्याची मागणी केज विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार तथा महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पृथ्वीराज साठे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पृथ्वीराज साठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही भारतीय नागरिक म्हणून आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे मतदान करण्याचा व लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार आम्ही मतदानाच्या रुपात वापरतो आहोत. आजही अमेरिका, जर्मनी, नेदरलँड, इटली सह बरेच प्रगत राष्ट्र ब्यालेटवर पेपरवर निवडणुका घेतात. पूर्वी भारतातसुद्धा निवडणुका या ब्यालेट पेपरवरच घेण्यात येऊन निकाल घोषित केला जात होता. सदर निवडणुकासाठी वेळ लागत होता परंतु निडणुका विश्वासपूर्वक व पारदर्शकपणे पार पाडल्या जात होत्या. परंतु सध्या देशासह राज्यातील निवडणुका ह्या ई.व्ही.एम मशिनवर घेण्यात येत आहेत. ई.व्ही.एम.हे मुळात एक यंत्र असून सदर यंत्रासोबत बहुतांश ठिकाणी छेडछाड करून झालेल्या निवडणुका व निकाल प्रभावित केल्या जात असल्याचा संशय येत आहे .

लोकशाहीमध्ये जर अशा प्रकारे जनमानसाच्या इच्छेविरुद्ध व संशयास्पदपणे निवडणुका घेतल्या गेल्या व त्या प्रभावित करून सरकार स्थापन केले गेले तर ते नागरिकांच्या मतांची बेईमानी केल्यासारखे होऊन मतदारांनी केलेल्या मतदानाची किंमत राहणार नाही आणि देश हुकुमशाही शक्तींच्या अधिपत्याखाली येईल. यामुळे देशाची संविधानिक लोकशाही देखील धोक्यात येईल अशी भीती या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे . महाराष्ट्र राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणूका जनमताच्या विपरीत जाऊन जनतेकडून त्यांची मते जाणून न घेता ई.व्ही.एम.द्वारे घेण्यात आल्या असून सदर निवडणूक हि संशयास्पद असून निवडणूक आयोगातील अधिकारी यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांसोबत संगनमत करून या निवडणुकीत गैरप्रकार करत ई.व्ही.एम. यंत्रात छेडछाड करून विधानसभेचे निकाल प्रभावित केलेले आहेत. यामुळेच या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करतो कि ई.व्ही.एम मशिनद्वारे घेण्यात आलेली विधानसभा निवडणूक २०२४ ही रद्द करण्यात यावी व फेरमतदान ब्यालेट पेपरवर घेण्यात यावे. आमच्या या मागणीची दखल न घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने जनांदोलन उभारू असा इशाराही पृथ्वीराज साठे व त्यांच्या महाविकास आघाडीतील अनेकक सहकार्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!