पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात ‘गीता जयंती’ निमित्त गीता अध्यायाचे सामूहिक पठण.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई,केंद्रीय विद्यासभा व गीता धर्म मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात दि.११ डिसेंबर २०२४ बुधवार रोजी ‘गीता जयंती’ निमित्त श्रीमदभगवद्गीतेच्या १२ व्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंबाजोगाई येथील श्री.खोलेश्वर मा.वि.स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरणदादा कोदरकर, विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आप्पाराव यादव,रा.स्व.संघ जिल्हा सद्भाव प्रमुख दत्तप्रसादजी रांदड,शहर सद्भाव प्रमुख कैलासजी मंगे,पोखरीतील गीता परिवार सदस्य वसंतराव पांचाळ व मुख्याध्यापक संजयराव विभूते यांच्या हस्ते श्रीभगवद्गीता ग्रंथ व भगवान श्रीकृष्ण,माता सरस्वती,अहिल्यादेवी होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सर्व प्रमुख मान्यवारांचे पुष्प व भगवद्गीता ग्रंथ देऊन विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.प्रस्ताविकेत गीता जयंती साजरी करण्याचा मुख्यउद्देश व संस्थेची भूमिका याविषयी सहशिक्षक विष्णू तेलंगे यांनी माहिती सांगितली.यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत’ चा जयघोष करत शंखध्वनीच्या मंगल सुरात आणि विद्यालयाच्या भव्य प्रांगणात एकूण ६२ विद्यार्थी,१० शिक्षक कर्मचारी आणि ०५ प्रमुख मान्यवरांनी गीतेतील १२व्या अध्यायाचे सामूहिक पठण केले.
अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मूल्यमापन प्रमुख विष्णु तेलंगे तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयराव विभूते यांनी केले.सर्वांना कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.