अंबाजोगाई

*शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या तिसऱ्या तालुकास्तरीय सामान्यज्ञान परीक्षेचे १९ जाने २०२५ रोजी आयोजन तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व शालेय विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान परीक्षेत सहभाग घ्यावा – विजय रापतवार*

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-

अंबाजोगाई तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाई च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद या थोर महान विभूतींच्या जयंतीनिमित्त यांच्या जीवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार व सचिव विष्णू सरवदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील खाजगी शाळासाहित जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील या सामान ज्ञान परीक्षेत सहभाग घेण्याचे आवाहन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

सदरील सामान्य ज्ञान परीक्षा ही ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी या दोन गटात होणार असून यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम व सन्मानचिन्ह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येणार आहेत. सध्याचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे , प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली असून या स्पर्धेत आपला किंवा आपल्या शाळेतील विद्यार्थी टिकावा यासाठी ही सामान्य ज्ञान परीक्षा उपयुक्त ठरणार असणार असल्याचे शिक्षक मैत्री प्रतिष्ठाण च्या वतीने अधोरेखित करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आहे प्रकारच्या स्पर्धा परीक्षा पासून वंचित असतात . पण शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमने ही बाब हेरून खाजगी संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अशी स्पर्धा परीक्षा अवगत व्हावी तसेच इथला विद्यार्थी देखील कोणत्याही स्पर्धेसाठी तयार व्हावा या उद्देशाने अंबाजोगाई तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांसाहित खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे . शहरातील विद्याथी हा संपूर्ण पणे त्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने तो अशा स्पर्धा परीक्षेत पारंगत होतो . मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व शाळेतील विद्यार्थी यांना शाळेत पाहिजे तशा सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे येथील विद्यार्थी हा काही अंशी पाठीमागे रहातो त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना देखील मोठया प्रमाणावर या स्पर्धेत सहभागी करून घेण्याचे प्रतिष्ठाणच्या वतीने ठरविण्यात आले आहे.

सदरील परीक्षा ही दोन गटांमध्ये होणार असून त्यामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी लहान गट व इयत्ता ८ वी ते १० वी मोठा गट असे करण्यात आले आहेत. या दोन्ही गटामधून परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास १५०१/- रुपये रोख व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास १००१/- रुपये रोख, व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ७०१/- रुपये व सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान ही परीक्षा रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा अंबाजोगाई शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या संकल्प विद्या मंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे .अशा प्रकारच्या सामान्य ज्ञान परीक्षेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडून त्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव होण्यास मदत मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना यापुढील काळातील त्यांच्या उज्वलव वाटचालीसाठी खूप मोठा फायदा झाल्याचे पहावयास मिळनार आहे. तेव्हा सदरील स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी आपापल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा असे आवाहन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांच्यासह उपाध्यक्ष पांडुरंग नरवडे, सचिव विष्णू सरवदे , सहसचिव शेख इरफान , कोषाध्यक्ष साधू गायकवाड, सल्लागार दत्ता देवकते,उमेश नाईक, सदस्य अनुरथ बांडे , बाळासाहेब माने , सुनील पवार , शेख आरिफ, शेख इरफान, उत्तरेश्वर मिटकरी, महेश वेदपाठक, संदीप दरवेशवार, समाधान धिवार, अशोक पोपळघट, गणेश तौर,श्रीनिवास मोरे रत्नाकर निकम, राजीव पटेल,श्रीधर देशपांडे, संत कराड, बालाजी जाधव,बालाजी टिळे, महेश पवार, मोरोपंत कुलकर्णी , आत्माराम बनसोडे ,जगन्नाथ वरपे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!