धाड टाकण्यासाठी पोलीस गाडी आली आणि भेदरलेल्या इसमाने लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली, कमरेखालील भागावर मोठा मार, रुग्णालयात उपचार सुरू
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
लॉजवर धाड टाकण्यासाठी पोलीस गाडी आली आणि भेदरलेल्या उमेश हावळे या इसमाने लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याने त्यांच्या कमरेखालील भागावर मोठा मार लागल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील बस स्थानकाच्या मागील बाजूस भर वस्ती मध्ये असलेला जनता लॉज हा सर्व परिचित लॉज असून या लॉज वर चालणाऱ्या गैर प्रकारा मुळे पोलिसांनी या पूर्वी अनेक वेळा धाडी टाकलेल्या आहेत व या धाडीत अनेक जोडपे पकडलेले आहेत हे पोलीस रेकॉर्ड आहे.
मंगळवारी दुपारी या लॉजवर धाड टाकण्यासाठी एक पोलीस गाडी आल्याचे या परिसरातील लोक सांगतात. ही पोलीस गाडी आल्याचे समजताच भेदरलेल्या उमेश हावळे नामक व्यक्तीने लॉज च्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र हा व्यक्ती खाली पडल्याने त्याच्या पाठीचे मणके मोडल्याची व कमरे खालील भागावर मोठा मार लागला असून त्याला स्वा रा ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याचे समजते.
दरम्यान या प्रकरणी पोलिसात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नसून हा व्यक्ती त्या ठिकाणी कशासाठी गेला होता याचीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.