बीड

*ज्ञानराधाच्या ठेवी मिळवण्यासाठी क्लेम अर्ज करण्याचे आवाहन*

बीड प्रतिनिधी:-

ज्ञानराधा मध्ये ज्या ग्राहकांनी आपली रक्कम मुदत ठेव किंवा बचत खात्यात जमा केली होती ती मिळवण्यासाठी खालील आवाहन करण्यात आले आहे

“प्रसिध्दीपत्रक”

अवसायक ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. बीड तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांचेवतीने सर्व ठेवीदार व खातेदार यांना आवाहन करण्यात येते की, ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवीची रक्कम व वेगवेगळया खात्यातील आपले नावे असलेली रक्कम मिळण्याबाबतचे क्लेम नोंदणी अर्ज शाखा जालना रोड, बीड येथे स्विकारणे चालु केलेले आहे. परंतु खातेदार व ठेवीदार खुप मोठया प्रमाणात गर्दी करीत आहेत. आपली गैर सोय होवू नये म्हणुन आपण समक्ष उपस्थित न राहता ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या ई-मेल dnyanradhaliquidator@gmail.com वर आपला अर्ज पाठविण्यात यावा.

अवसायकाकडे यापुर्वी क्लेम बाबतचे अर्ज दिले असतील तर पुन्हा अर्ज पाठविण्याची आवश्यकता नाही. तसेच क्लेमचा कोणताही नमुना नाही तो छापिल असावा असाहि नाही. आपण हाताने ठेवीची माहिती भरुन केला तरी चालेल याची नोंद घ्यावी.

दिनांकः-२४ जानेवारी, २०२५

ठिकाण:- बीड

Co-op Cred Society Ltd State Under Liquidation MCCS/CR 329/2010/Co P

mad (संमृत जाधव)

अवसायक,

ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बीड तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!