*नरेंद्र काळे यांची पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्यपदी निवड*
बीड प्रतिनिधी:-
या नियुक्ती बददल डॉ. नरेंद्र काळे यांनी जिल्ह्याचे खा. बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी मा. अविनाशजी पाठक व नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती श्वेता मुन्नरवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच ‘आपल्या ज्ञानाचा व शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग जिल्ह्यातील या महत्त्वाच्या संस्थेच्या विकासासाठी मी करेन,’ असे प्रतिपादन डॉ. नरेंद्र काळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील उच्च गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे या विद्यालयात इ. ६ वी पासून प्रवेश मिळतो. सीबीएसई अभ्यासक्रमाची इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग इथे चालतात. सुमारे ३० एकरच्या परीसरात विद्यार्थांसाठी उत्तम व अद्ययावत शैक्षणिक, क्रिडा, कला, निवास व भोजनाची व्यवस्था नवोदय विद्यालय, गढी याठिकाणी आहे.
येत्या शैक्षणिक वर्षातील ८० जागांसाठी नुकत्याच झालेल्या प्रवेश परीक्षेत सुमारे १५,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील अतिशय सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयातून शिक्षण घेऊन आपले करीयर उंचावले आहे.