बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून बीडमध्ये आलेल्या एका तरुणाला पकडत त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि एका पिस्टल राऊंडसह ताब्यात घेतला आहे .या तरुणासह त्याच्या इतर साथीदारांवर आष्टी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलां आहे.
या तरुणांना अल्पवयीन मुलीलाही पळवून आणल्याचंही समोर आलं आहे .यासंबंधी पोलिसांनी पीडित मुलीस इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत
बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल आणि एक पिस्टल राऊंड सह पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या तरुणाला ताब्यात घेतलं. आष्टी तालुक्यातील केरूळ येथे छापा टाकला असता या तरुणाची झडती घेण्यात आली. त्याच्यावर शस्त्रसाठा बाळगल्याचा आरोप असून त्याने अल्पवयीन मुलीला पळवून आणण्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान अंभोरा पोलिसांनी या केलेल्या या कारवाईदरम्यान आरोपी दत्तू कांबळे यास अटक करण्यात आली आहे. दत्तू कांबळे हा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा राहणारा असून त्याच्यावर याआधीच सहा गुन्हे दाखल करण्यात आलेत. केरूळ येथे कारवाई करताना त्याच्याकडे दोन गावठी पिस्टल आणि एक पिस्टल राऊंड आढळला. याप्रकरणी अंभोरा पोलिसांनी आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून त्याला आष्टी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
*अल्पवयीन मुलीला पळवून आणल्याचे समोर*
आरोपीने एका अल्पवयीन मुलीला पळवून आणल्याचे ही तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्याला याबाबत माहिती देऊन पीडित मुलीस इंदापूर पोलिसांच्या ताब्यात सुपूर्त केलंय. आरोपी दत्तू कांबळे याच्याविरुद्ध पुण्यातील इंदापूर पोलीस ठाण्यात याआधीच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्र साठ्यामुळे त्याचे इतर साथीदारांविषयीही माहिती मिळण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून अंभोरा पोलिसांच्या या कारवाईने मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. स्थानिक पोलीस दल आरोपींच्या इतर कारवायांवरही तपास करत आहे.