संभाजीनगर

*मोक्कातील(MCOCA Act) आरोपीचे “मोका” पाहून पालायन; सहा पोलिसांना निलंबनाचे “बक्षीस”!*

छत्रपती संभाजीनगर :- जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या शिऊर पोलीस ठाणे अंतर्गत एक आरोपी गेल्या दहा महिन्यांपासून मोक्का कायद्यांतर्गत हरसुल कारागृहात शिक्षा भोगत आहे पुढील कारवाईसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी दिनांक 27 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी नगर येथील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती 27 तारखेला 16 आरोपींना घेऊन जाण्यासाठी 13 कर्मचारी नियुक्त केले होते त्यानुसार 27 तारखेला छत्रपती संभाजी नगर येथील हरसुल कारागृहातून आरोपींना वैजापूर येथील पहिले अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपींना हजर ही करण्यात आले आणि एका आरोपीची सुनावणी राहिल्यामुळे इतर कर्मचारी आणि आरोपी हे न्यायालयाच्या बाहेर वाहनात येऊन बसले त्याच दरम्यान एका आरोपीची वाट पाहत असताना थांबलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन या प्रकरणातील आरोपी धीरज भारम भोसले, याने हातकडीसह पोलीस वाहनाच्या आपत्कालीन दारातून पलायन केले. त्यानंतर हा आरोपी वैजापूर मध्ये विविध ठिकाणी आपल्या मित्रासह दुचाकीवरून जात असताना दिसून आला आहे परंतु अद्याप पर्यंत पोलिसांच्या तो हाती लागला नाही दरम्यान वैजापूर पोलीस ठाण्यात या आरोपीविरुद्ध पुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे याप्रकरणी कर्तव्यात कसूर केला म्हणून छत्रपती संभाजी नगरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी दिनांक 30 रोजी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे निलंबित सर्व कर्मचारी हे पोलीस मुख्यालयात नियुक्त होते त्यांच्यामध्ये सहाय्यक फौजदार जाकीर सिकंदर खान पठाण पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम खान आमिर खान पठाण पोलीस शिपाई राम मोहन राठोड रमेश सारंगधर पायघन गणेश नंदकिशोर अंतर आणि ज्ञानदेव नामदेव केंद्रे यांचा समावेश आहे. मोका म्हणजे काय MCOCA Act 1919,the maharashtra control of crime Act 1919) एखादा गुन्हेगार संघटित गुन्हेगारी करत आहे आणि त्याच्यावर दोन वेळा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. असे असतानाही तो पोलिसांच्या नियंत्रणात येत नाही आणि वारंवार खंडणी मागणे, हप्ते वसूल करणे, सुपारी घेणे, तस्करी करणे, अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा गुन्हेगार .ज्याला पोलीस प्रशासन वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हेगारी वाढू नये म्हणून कारागृहात पाठवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!