सखुबाई दिगंबर कस्बे रा समता नगर, लोकसहभागातून मिळालं हक्काचं घर, डोळ्यातून निघाले आनंदाश्रू.आज मान्यवरांच्या हस्ते फित कापून गृह प्रवेशाचे उद्घाटन केले.
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
सखुबाई दिगंबर कस्बे या समता नगर भागातील नाल्याच्या बाजुस मातीच्या भेंड्या पासुन बनवण्यात आलेल्या विटा पासुन लाहानस घर होते,मात्र ते पावसामुळे भिजून गेल्यामुळे पूर्ण भिंत ओली असल्यामुळे पडझड झाली होती पूर्ण पत्रे गळके होते पावसाळ्यात नाल्याला पाणी आले की पूर्ण घाण पाणी घरात शिरले जातात आणि राहण्यास शिल्लक जागाच नसत , पावसाळ्यामध्ये सखुबाई शेजाऱ्या बाजारी घराच्या बाहेर आसरा घेत असे. कोणी आसरा देत तर कोणी देत नसे. सखुबाईला मुलगा मुलगी होती मात्र त्यांचे निधन झाले, तसेच पतीचेही तीन-चार वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळे सखुबाई वर दुःखाचा डोंगर कोसळला कारण पाहणारे कोणीही नाही. खांडीभर नातेवाईक आहे पण कोण पाहणार मानव लोक कडून गेल्या आठ वर्षापासून किराणा सामान फिट दिली जाते त्याच्यावरच आपले गुजरानकरत असे, निराधारचे अनुदान मिळत आहे त्यामधून गोळ्या पाणी व इतर खर्च करत. सखुबाईला वाटू लागली की खायला आहे, मात्र राहण्यास घर नाही त्यामुळे सखुबाई पावसाळ्यात सैरावैरा पळत असे. मानव लोककडे आल्या आणि म्हणाल्या जसं खायला देतात तसे एक-दोन पत्राचं घर द्या एवढाच आशेचा किरण आहे.
आणि असे ठरवले की आपण लोक सहभागातून एक लहानसा घर देता येईल का त्यामुळे अनेकांशी चर्चा केली आणि एक लहानस घर बांधून देण्याचे ठरले अनेकांनी यासाठी अर्थसहाय्य केले, अनेकांनी विटा, पत्रे, सिमेंट, घराचे खिडकी, डस्ट , मुरूम, अशा प्रकारे सहाय्य केले आणि एक छानसे टुमदार घर बांधून देण्यात आले. सखुबाईच्या घरी अनेक मान्यवर आले आणि सखुबाईनी डोळ्यातील आनंदाश्रूला वाट मोकळी करून दिली, त्या म्हणाले की मी आजवर कोठे आडोसा घेऊन रात्र काढत असे मला जवळ कोणीही केले नाही पण आज घर झाल्यामुळे अनेक नातेवाईक अस्थिवायकपणे विचारत आहेत. घर झाल्यामुळे आता मला कुठे जायचे गरज नाही ऊन पाऊस वारा आला तरी मला काहीतरी नाही.
या लोकार्पण सोहळ्यासाठी, मा. नंदकिशोर मुंदडा, मानवलोकचे अनिकेत लोहिया, डॉ, संदीप थोरात, डॉ, हर्षमाला काळे, संतोष लोमटे, स्वेक्षा लोहिया, सचीन डोंगरे, सुभाष ताटे, संजय साळवे, नरसिंग साबणे, दादासाहेब कस्बे, परमेश्वर गीते, बबन मारवाड, अनिल बनसोडे, संतोष चव्हाण, बालाजी शेरेकर इत्यादी.