बीड

आष्टीचा दुष्काळ हा भूतकाळ होईल शिंपोरा ते खुंटेफळ उपसा सिंचन योजना गतीने पूर्णत्वास जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

आष्टी प्रतिनिधी:–

मराठवाड्यासह आष्टी विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच दुष्काळी आहे. येणाऱ्या काळात मराठवाड्यासह सर आष्टी विधानसभा मतदारसंघ त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देऊन दुष्काळ मुक्त करू, त्याचबरोबर शिंपोरा ते खुंटेफळ उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यानंतर या भागाचा दुष्काळ हा भूतकाळ असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते खुंटेफळ येथे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक 3 या योजनेअंतर्गत बोगद्या च्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ येथे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा क्र.3 अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामांची पाहणी तसेच बोगदा भुमिपुजन बुधवार दि.5 रोजी दुपारी 2 वा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला‌.यावेळी ना. फडणवीस बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पर्यावरणमंत्री ना.पंकजा मुंडे,महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खासदार बजरंग सोनवणे,आमदार प्रकाश सोळंके, आ.नमिता मुंदडा,आ.विजयसिंह पंडित,आ.संदिप क्षिरसागर,आ.नारायण पाटील,माजी आ.भिमराव धोंडे,रेशमी बागल,वफ्क बोर्डाचे अध्यक्ष समिर काझी,माजी आ.लक्ष्मण पवार,माजी आ.साहेबराव दरेकर,जलसंपदाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपुर,कार्यकारी संचालक संतोष तिरमनल,विजय घोगरे, नगराध्यक्ष जिया बेग यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालो तेव्हा 23 टिएमसी पाणि मराठवाड्याला मिळणार होते पण प्रत्येक्षात फक्त 7 टिएमसीच पाणि शिल्लक असल्याचे दिसून आले.आणि 2022 मध्ये मी जलसंपदामंत्री झाल्यानंतर सर्वात आगोदर मी सुप्रमा दिली ती या प्रकल्पासाठी 11 हजार कोटींची दिली.कारण माझ्याकडे सुरेश धस पाठपुरावठ्यामुळे द्यावीच लागली कारण धस मागे लागले म्हणजे विषयच नसतो.आता आपल्याला आष्टी तालुकाच नाही तर संपुर्ण मराठवाडा दुष्काळ मुक्त करायचा असल्याचे सांगत वाहून जाणारे 53 टिएमसी पाणि गोदावरीमध्ये आणले तर पुढची कोणतीच पिढी मराठवाड्यातील दुष्काळ बघणार नाही.आता आपण नदीजोड प्रकल्पावर भर दिली असुन त्याची टेंडर प्रक्रियाही पुर्ण होऊन येत्या वर्षभरात गोदावरी खो-यात पाणि सरकार आणणार आहे.उपसा सिंचन योजना म्हणलं की त्याला खुप विज लागते पण हि योजना आपण सोलरवर टाकणार असल्याने शेतक-यांना त्रास होणार नाही.महाराष्ट्र हे पहिले राज्य असे आहे की, 2027 पर्यंत बाराही महिने दिवसा वीज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंपदाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपुर यांनी करत हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर आत्ता पर्यंत 550 कोटी खर्च झाले असून 1300 कोटी रूपये खर्च करायचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या सभेला मतदारसंघातील आजी माजी पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा प्रकल्प वेळेच्या आधी पूर्ण करणार – ना. विखे पाटील

दुष्काळ ग्रस्त भागाला संधी देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे.तसेच या मतदार संघातील जनतेसाठी आपलं काहिच झाले तरी प्रश्न मार्गी कसा लावायचे याचे नियोजन करणारा नेता म्हणजे सुरेश धस होय,या प्रकल्पाचे दोन टप्प्यांत कामे करायचे आहे आणि आज पहिला टप्प्याचे काम आता पुर्ण झाला आहे.जर दोन्ही टप्प्याचे काम पुर्ण झाले तर 33 हजार हेक्टर ओलिताखाली येणार आहे. आणि मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प जेवढ्या वेळात पुर्ण करायचा आहे. त्या कालावधीपेक्षा कमी वेळेत हे काम पुर्ण करणार असल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली.

मेरा वचन ही मेरा शासन – ना. पंकजाताई मुंडे

ज्या ठिकाणी खुंटेफळ प्रकल्प उभा राहत आहे ही जागा सैन्य दलाच्या ताब्यात जाणार होती. परंतु ही जागा सैन्य दलाच्या छावण्यासाठी जाऊन देण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले. तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेऊन या जागेचे सैन्यासाठी होणारे संपादन रोखले होते. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रकल्प उभा राहत असल्याचा आनंद असल्याचेही ना. पंकजा मुंडे यांनी सांगितले. गद्दारी करणे हे माझ्या रक्तात नाही मी दिलेला शब्द कधीही मागे घेत नाही आम्ही नेहमीच इतरांना इज्जत दिली आहे. या उद्घाटन प्रसंगी मी येणार की नाही याबाबत चर्चा सुरू होत्या परंतु मी या जिल्ह्यातील मंत्री आहे त्यामुळे माझ्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी विकास कामे होणार असतील त्या ठिकाणी मी निमंत्रण नसतानाही जाईल कोणी बॅनर वर फोटो लावू अथवा न लावू याच मला राग नाही. परंतु मी आजपर्यंत कोणालाही दिलेला शब्द मागे घेतलेला नाही मेरा वचन हे मेरा शासन असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला.

मला मंत्री पालकमंत्री पद नको फक्त मतदारसंघाला पाणी द्या 

– आ. सुरेश धस

आमदार सुरेश धस म्हणाले,दि.23/8/2007 ला या प्रकल्पासा ठी मंजुरी मिळाली आणि 13/1/2009 रोजी सर्व्हेक्षण केले आणि त्या सर्व्हेक्षणाच्या वेळी 400 लोकं दगडं घेऊन मागे लागले होते‌.आज या कामासाठी अजित पवार,पंकजा मुंडे,माजी खा.प्रितम मुंडे,माजी मंत्री रामदास कदम यांचे सहकार्य लाभले आहे.मी 2014 ला पराभुत झालो त्यानंतर 10 वर्षात फक्त तलावाचे भिंतीचे काम फक्त दोन टक्केच काम झाले असल्याचे आमदार धस यांनी सांगत तुम्ही सत्तेत आल्यानंतर 23 टक्के या तलावाचे काम पुर्ण केले आहे.तसेच आम्हाला फक्त जे काहि आमच्या मतदारसंघाला भरपुर देण्याची दानत फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात आणि आमची अपेक्षा पण दुसरी कुणाकडून नसल्याचे सांगत पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.दिवार चित्रपटाचा डॉयलॉग सांगत माझ्याकडे काहि नसले तरी चालेल पण मला मंत्रिपद नको,

पालकमंत्री पद नको आणि मला फक्त मतदार संघाला 4.68 टिएमसी आणि 3.5 टिएमसी पाणि द्यावे आणि माझ्यामागे देवेंद्र बाहुबली असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!