*परळी मधून आजून एक धक्कादायक गोष्ट समोर नौकरी लावतो म्हणुन अमिष दाखवत दोन तरुणांची 12 लाख रुपयाची फसवणूक*
*नोकरीच्या आशेने शेती विकुन तरुणाने दिली होती रक्कम*
परळी प्रतिनिधी – सरकारी शाळेत शिपाई आणि क्लर्क पदावर नोकरी लावतो, असे आमिष दाखवून धिरज बद्रीनारायण बाहेती आणि दीपा धीरज बाहेती या दाम्पत्याने दोघा तरुणांकडून तब्बल १२ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाहेती दाम्पत्यावर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निसर्ग अनंतराव जमशेटटे (रा. कृष्णा नगर, परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये अनंत ढोपरे याने निसर्ग याला सांगितले की, धिरज बद्रीनारायण बाहेती (रा. परळी) यास परळी तालुक्यातील मौजे रेवली येथे ‘शाहू फुले आंबेडकर’ नावाने शाळा मंजूर झाली आहे. तिथे माझे क्लर्क म्हणून काम होत असून शिपाई पदासाठी जागा रिक्त आहे. मात्र, त्यासाठी १२ लाख रुपये भरावे लागतील, त्यापैकी ६ लाख रुपये लगेच आणि उर्वरित ऑर्डर आल्यानंतर भरावे लागतील. या माहितीनंतर निसर्ग आणि त्याच्या वडिलांनी विकासराव डुबे यांच्यासह धिरज बद्रीनारायण बाहेती याची भेट घेऊन खातरजमा केली. बाहेतीने ही ऑफर खरी असल्याचा दावा केला आणि त्याच्या पत्नी दिपा बाहेती व उमेश तपके यांच्याशी संपर्कात राहण्यास सांगितले. शेती विकून दिले ६ लाख रुपये!
नोकरीच्या आशेने निसर्गच्या वडिलांनी तब्बल ८ लाखांना एक एकर शेती विकली आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी मोंढा मार्केटमधील ‘बाहेती ऑफसेट’ येथे जाऊन ६ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. यावेळी धिरज बाहेती, दिपा बाहेती आणि उमेश तपके हे उपस्थित होते. पैसे घेताना बाहेतीने काम न झाल्यास बँकेच्या व्याजाप्रमाणे रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले.
ठरलेल्या प्रमाणे १५ जून २०२४ रोजी निसर्ग आणि अनंत यांनी उमेश तपके यांना भेटून जॉइनिंग ऑर्डरची विचारणा केली. मात्र, धिरज बाहेती आणि दिपा बाहेती परळी सोडून फरार झाले असल्याची माहिती मिळाली. जुलै २०२४ मध्ये धिरज बाहेतीने संपर्क साधून “तुम्ही हायपर होऊ नका, लवकरच पैसे देतो” असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा संपर्कच तुटला. पीडितांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, दिपा बाहेती हिने फोन करून “एक महिना थांबा” असे सांगितले. मात्र, अद्याप रक्कम परत करण्यात आलेली नाही. त्यामुळे मला शिपाई म्हणून तर अनंत ढोपरे यास क्लार्क म्हणून नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी सहा लाख घेऊन एकूण १२ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार निसर्ग जमशेटटे यांनी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रार