धानोरा खुर्द ता. अंबाजोगाई येथे सेवा मतिमंद निवासी शेतकी प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यां बरोबर साक्षी घुले कुटुंबीय आणि मित्रपरिवार.
साक्षीने पहिल्या वेतनातून भरवला दिव्यांग विद्यार्थ्यांना घास
धानोरा खुर्द येथील सेवा मतिमंद शाळेत घुले कुटुंबियाकडून भोजनाचा कार्यक्रम
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील सौ. सुमतीबाई गुणाले मतिमंद विद्यार्थ्याचे निवासी शेतकी पुनर्वसन शिक्षण प्रशिक्षण केंद्राला साक्षी घुले हिने भेट देऊन तिला मिळालेले पहिले वेतन शाळेला देऊन मतिमंद विद्यार्थ्यांना घास भरवला . साक्षीने शासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वीच संकल्प केला होता की शासकीय सेवेत रुजू झाल्यास समाजातील गरजू व्यक्तींना पहिल्या वेतनातून लाभ देण्याचा त्यांनी संकल्प केला होता. शासकीय सेवेत रुजू होताच पहिले वेतन आल्याबरोबर मतिमंद शाळेतील दिव्यांगांना भोजनाचा कार्यक्रम ठेवून आपला संकल्प पूर्ण केला. साक्षीने राबवलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
मतिमंद विद्यार्थ्यांबरोबर घुले कुटुंबीयांनी एक दिवस घालवला. साक्षी घुले शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल जाधव कुटुंबीयांकडून साक्षी हिचा सत्कार करण्यात आला.
धारूर पोलीस ठाण्यातील जमादार शशिकांत घुले यांची कन्या साक्षी घुले ऑक्टोबर महिन्यात राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाल्या. अनेक जण शासकीय सेवेत रुजू झाल्यास पहिले वेतन आल्यास कोणी देवाला देणगी देतात. देवाला बोललेला नवस फेडतात. काहीजण आपल्या परिवाराला देवदर्शनाला पाठवतात. साक्षीने मात्र सेवेत रुजू होण्यापूर्वीच संकल्प केला होता की शासकीय सेवेत रुजू झाल्यास पहिले वेतन समाजातील गरजू व्यक्तींना त्या वेतनाचा लाभ द्यायचा. साक्षीचे पहिले वेतन या महिन्यात आले. साक्षीने आई-वडिलांना तिचा संकल्प सांगितला आणि धानोरा येथील सो सुमती बाई गुणाले सेवा मतिमंद विद्यार्थ्याची निवासी शेतकी शिक्षण प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन सेवा मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना तिच्या वेतनातून भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या विद्यार्थ्यांबरोबर घुले कुटुंबीयांनी भोजनाचा आनंद घेतला . साक्षीने राबवलेल्या उपक्रमाचे कुटुंबा आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.
यावेळी शशिकांत घुले ,संध्या घुले ,साक्षी घुले राजेंद्र जाधव, श्रीकन्या जाधव ,गोरख यादव ,पाराराम यादव, वेंकटराव हंगे बालाजी बिक्कड , शाळेचे मुख्याध्यापक मनोज चेवले, वस्तीगृह अधीक्षक रोहित मलिसे , भाऊसाहेब भोसले, प्रवीण गाडे, संगीता गोवगावकर केंद्रातील सर्व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.