केज

दरोड्यातील एक कोटींचे सोने 25 लाखात खरेदी करणाऱ्या सराफाच्या घरावर तामिळनाडू पोलीसांचा छापा, छतावरून उडी टाकून व्यापाऱ्याचे पलायन

केज (प्रतिनिधी)

दरोड्या मधील एक किलो दोनशे ग्रॅम वजनाचे अंदाजे एक कोटी रूपये किंमतीचे सोने केज तालुक्यातील नांदूरघाट येथील सराफा व्यापाऱ्याने घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्या वरून तामिळनाडू पोलीस व केज पोलीसांनी सराफाच्या मुसक्या आवळण्या साठी त्याच्या घरावर अचानक छापा टाकून कारवाई केली मात्र पोलीस आल्याचे पाहून या व्यापाऱ्याने घराच्या छतावरून उडी टाकून पलायन केले. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील नांदूरघाट येथील सोन्याचे व्यापारी असलेल्या अनिल बडे याने तामिळनाडू राज्यातील चोरीच्या घटनेतील चोरांनी चोरी केलेले तब्बल एक किलो दोनशे ग्रॅम वजनाचे अंदाजे एक कोटी रूपये किंमतीचे सोने तडजोडीत केवळ पंचेवीस लाख रूपयाला चोरांकडून घेतले होते. या चोरीच्या घटनेचा तपास करणाऱ्या तामिळनाडू पोलीसांनी या चोरीच्या गुन्ह्यातील तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चोरीचे सोने कोणाला विकले याची माहिती घेतली. त्या तीन संशयितांना घेऊन तामिळनाडू पोलिसांनी केज पोलीसांच्या मदतीने सोमवारी सकाळी नांदुरघाट येथील संबंधीत सोन्याच्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला.

त्यावेळी पोलीस आल्याचे पाहून अनिल बडे हा घराच्या छतावरून उडी टाकून पसार झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस नांदुरघाट येथे ठाण मांडून आसून व्यापाऱ्याने ठरलेल्या पंचेवीस लाख रक्कमेपैकी चौदा लाख रूपये चोरांना दिले असून अकरा लाख रुपये देणे बाकी आहेत.

ही कारवाई तामिळनाडू पोलिसांसह केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, नांदूरघाट पोलीस चौकीचे पाशा शेख, राजू वंजारे व शमीम पाशा यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून तामिळनाडू पोलीस चोरीच्या घटनेत ताब्यात घेतलेल्या तीन चोरांना घेऊन नांदूरघाट मध्ये तळ ठोकून आसून विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये, यासाठी तामिळनाडू पोलीस वाहनाला बनावट नंबर प्लेट खोटा नंबर लावून ही कारवाई केली आहे. या तामिळनाडू पोलीसांच्या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!