*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत:-अनिल डाके*
अंबाजोगाई प्रतिनिधी:- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट छावा सध्या खूप जोरदार चालत आहे आज अंबेजोगाई येथील मोहन टॉकीज या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे यांच्या वेशभूषेमध्ये प्रसिद्ध रील स्टार अनिल डाके हे छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेमध्ये सिनेमा थिएटरमध्ये सर्व प्रेक्षकांना सरप्राईज दिले अनिल डाके यांना पाहून हुबेहूब छत्रपती संभाजी महाराज दिसत होते सिनेमांमध्ये पाहत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला पाहून प्रेक्षक हुबेहूब संभाजी महाराजच आपल्या समोर आल्यासारखा भास होत होता त्यांना पाहून प्रेक्षक थक्क झाले आणि प्रेक्षकांनी सिनेमा थिएटर मध्येच हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा द्यायला सुरू केले माता तुळजापूरची भूमी सुद्धा तुझ्या रक्ताने, पावन झाली असावी अशी भावना जनतेमधून होत आहे छत्रपती संभाजी महाराज साखळदंड केलेले पाहून, लहान मुलांना पण अश्रू आवरण झाले धन्य ती भूमी जी आपल्या रक्ताने स्पर्श,पाहुनी शौर्य आपल्या पुढे, मृत्युही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला असे उद्गार पूर्ण प्रेक्षकाच्या तोंडून ऐकवयास मिळाले ..
*धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भूमिका -अनिल डाके*
*शंभूराजांची भूमिका करणाऱ्या बालकलाकारा- अजिंक काळे*
*कॅमेरामन आणि व्हिडिओ एडिटिंग – देवा देवकते*
*लाइट मॅन – अविनाश साळुंके* *
कॅमेरा सहायक – सोनाली राठोड हे सर्व आपली भूमिका पार पडताना दिसून आले