कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन, आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन
परळी वैजनाथ दि.१७ (प्रतिनिधी)
येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शासनाच्या वतीने विविध मागण्यांची पुरत्या होत नसल्याने सोमवारी (या.१७) आंदोलन करण्यात आले.आंदोलनानंतर आपल्या थकीत मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार परवेज पठाण यांना देण्यात आले.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यावर निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वतीने राज्यभर सोमवारी आंदोलन करण्यात आले.याचाच एक भाग म्हणून येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पदभार घेतल्यापासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकदाही स्वतंत्र बैठक घेतली नाही व समस्यांचे निराकरणही केले नाही. त्यामुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त यांना त्यांच्या कार्याल्यासमोर आंदोलन करून धरणे निवेदन दिले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांबाबत शासनाने चर्चा करून २ फेब्रुवारी २४ रोजी मागण्या मान्य करीत लेखी आश्वासन दिल्यानंतर महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला होता. त्यानंतर मान्य मागण्यांमधील १२९८ वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी सदर पदांवर कार्यरत केवळ २८३ शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश काढला व राज्यात काही शिक्षकांचे समावेशन करण्यात आले परंतु अनेक शिक्षकांचे समावेशन अजून झालेले नाही. आय टी शिक्षकांच्या समायोजनाचा शासनादेश, अंशतः अनुदान प्राप्त शिक्षकांना वाढीव टप्पा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे आदि मान्य मागण्यांचे आदेश निघाले नाहीत. त्याबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही अद्याप आपण
चर्चाही केली नाही. तो आमच्या तसेच सर्व शिक्षकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून महासंघाने पुन्हा आंदोलन केले.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ, विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी. जाहीर केलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी. जाहीर केलेले अनुदान त्वरित देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रा सुनील लोमटे यांच्यासह उपप्राचार्य हरिष मुंडे, प्रा प्रविण फुटके, प्रा डॉ अंकुश वाघमारे, प्रा राख, प्रा प्रसाद, प्रा डॉ बापू घोलप, प्रा. पंजाबराव येडे, प्रा. प्रविण नव्हाडे, प्रा मेंडके, प्रा देशमुख, प्रा कराड, प्रा चव्हाण, प्रा ढाकणे, प्रा फड, प्रा हरगुळे, प्रा बिराजदार, प्रा स्वामी, प्रा राऊत, प्रा पवार, प्रा खांडगे, प्रा ढेपे,प्रा मुंडेसह पदाधिकारी उपस्थित होते.