परळी

परळी-मुंबई रेल्वे सुरू करु, डॉ. पतकराव : रेल्वे संघर्ष समितीने दिले निवेदन 

बीड- परळी वैजनाथ :– परळी-मुंबई रेल्वे सुरू करा, या मागणीचे निवेदन रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आल्यानंतर परळी-मुंबई रेल्वे सेवा सुरू करू, असे आश्वासन प्रादेशिक रेल्वे सल्लागार डॉ. अदित्य पतकराव यांनी येथे रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

 

येथे भेटीदरम्यान वैद्यनाथ मंदिराच्या प्रांगणात रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परळी-मुंबई रेल्वे सुरू करा, या मागणीचे निवेदन दिले. सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान रेल्वे नसल्याने परळी-लातूर रोड कनेक्टिव्हिटी रेल्वे सुरू करावी. नागपूर-कोल्हापूर नियमित रेल्वे करावी, नवीन रेल्वे सुरू कराव्यात, परळी रेल्वेस्थानक अधिक उत्पन्न देणारे असल्याने पीटलाइन करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यनारायण डुबे, विलासराव ताटे, रमेश चौंडे, संजय खाकरे, धनंजय आरबुने, मुन्ना ताटे, नितीन बागवाले, अमोल सूर्यवंशी, नितीन ढाकणे, अजय चौधरी, कल्पेश बागवाले, दर्शन सपाटे, चेतन बागवाले, वैजनाथ जोशी, कृष्णा गायकवाड, लखन गायकवाड, बाळू फुले, योगेश स्वामी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893841
error: Content is protected !!