मुंबई महानगरपालिका एन विभागाच्या प्रभाग क्रमांक १२३ च्या अधिकारी आका कडून प्रभागातील विकास कामांमध्ये कंत्राटदारांना खुश करण्यासाठी महापालिकेच्या निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर
मुंबई घाटकोपर:–मुंबई महापालिकेत नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर मुंबई महानगरपालिका आयुक्त हे सध्या पालिकेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.मुंबई महानगरपालिका एन विभागाच्या प्रभाग क्रमांक १२३ चा जबाबदार अधिकारी आका विकास कामांच्या नावाखाली मुंबई महानगरपालिकेच्या निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असून फक्त कंत्राटदारांना खुश करण्यासाठी १२३ या प्रभागात निष्कृट दर्जाची या आका कडून कामे केली जात आहेत.तसेच या आका वर कोणाचे ही नियंत्रण नसल्याचे याठिकाणी दिसत असून या प्रभाग क्रमांक १२३ मध्ये पालिका एन विभागाच्या आकाचा याठिकाणी अनागोंदी कारभार चालू आहे.हा आका मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकराज याचा पुरेपूर फायदा घेत असून,फक्त हा आका आणि त्यांची कंत्राटदार पिळावळ आणि त्यांची बिले असे समीकरण याठिकाणी तयार झाले आहे.तसेच या आकांना फक्त त्यांचे कंत्राटदार जवळचे झाले असून एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी या आकांना विकास कामांविषयी प्रश्न तसेच माहिती विचारल्यास हे आका त्यांच्याशी अरेरावीची भाषा करतात त्यांना सर्वसामान्य लोकांच्या विकास कामांच्या कामाविषयी बोलायला वेळ नसतो.फक्त कंत्राटदारांशी बोलायला अधिक वेळ आहे.त्यामुळे यावरून हे आका आणि त्यांचे कंत्राटदार यांचे खोलवर किती आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत,हे यावरून स्पष्ट होत आहे.
तसेच हे एन विभागाचे प्रभाग क्रमांक १२३ चे जबाबदार अधिकारी आका मागील अनेक वर्षांपासून एन विभागात कार्यरत असून कामकाज करत आहेत.शासन अधिसूचना दि.२५.०५.२००६ विधिनियम विषयक २००५ मधील प्रकरण दोन,कलम ३(१) अन्वये सेवेतील अधिकारी यांच्याकरिता एखाद्या पदावर राहण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षाचा आहे.तर मग हे आका गेली अनेक वर्षे आतापर्यंत एन विभागात कार्यरत कसे आहेत? तर मग या आकाचा आका कोण आहे?या आकाच्या कार्यकाळाची व कामकाजाची चौकशी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला असून संबंधित वरिष्ठ प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.