बोर ची मोटर बंद करायला गेले आणी विजेचा शॉक लागून तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू..
आष्टी (प्रतिनिधी) :– झाडांना पाणी देऊन बोअरची मोटार बंद करण्यास गेला असता विजेचा शॉक बसून (दि.१०) गुरुवार. रोजी रात्री ११ च्या सुमारास अॅड. अमोल पंढरीनाथ पारखे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. आष्टी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथील रहिवासी तथा तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. पंढरीनाथ पारखे यांचा मुलागा अॅड. अमोल पारखे हे (दि.१०) गुरुवार रोजी रात्री ११ च्या सुमारास आपल्या घरासमोरील झाडांना पाणी देत होते. झाडांना पाणी देऊन झाल्यावर बोअरची मोटार बंद करण्यासाठी गेले असता त्यांचा हात स्टार्टर मधील उघड्या वायरला
लागल्याने त्यांना विजेचा शॉक बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. यावेळी वडील अॅड. पंढरीनाथ पारखे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही विजेचा शॉक बसून बाजूला फेकले गेले. मयत अमोल पारखे हे आष्टी न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ अँड. पंढरीनाथ पारखे यांचे चिरंजीव आहेत. अॅड. अमोल पारखे हे आष्टी न्यायालयात वडिलांबरोबर वकीली करत होते. अमोल यांच्या अपघाती मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत अमोल यांच्या मृत्युदेहावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.