क्रीडा भारती स्थापना दिवस उत्साहात साजरा
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
क्रीडा भारती अंबाजोगाई च्या वतीने श्री हनुमान जयंती तथा क्रीडा भारती स्थापना दिवस उत्साहात संपन्न झाला.
श्रीराम नगर अंबाजोगाई येथील केशरीनंदन हनुमान मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा भारतीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने बलोपासनेची देवता श्री महाबली हनुमानाची जन्मदिनाच्या निमित्ताने पुजा व आरती करण्यात आली.
यावेळी क्रीडा भारती चे योग शिक्षक उत्रेश्वर पांचाळ गुरुजी यांनी व्हिएतनाम येथील हनोई येथे वर्ल्ड योगा स्पोर्ट्स फेडरेशन तर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या वर्ल्ड आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवून सिव्हर मेडल प्राप्त केल्याबद्दल क्रीडा भारती अंबाजोगाई च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अंबाजोगाई तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक रमणजी सोनवळकर, ज्ञानेश मातेकर, सतिश बलुतकर,सह क्रीडा भारती चे. सदस्य तथा क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.