महात्मा जोतिराव फुले स्मारकाचे भव्य अनावरण — अंबाजोगाईच्या माळीनगर परिसरात समतेचा नवा दीप प्रज्वलित*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) समाजसुधारक, सत्यशोधक आणि शिक्षणाचा प्रकाश पसरवणारे थोर विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई येथील माळीनगर परिसरात भव्य स्मारकाचे अनावरण अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले.
या स्मारकाचे वैशिष्ट्य म्हणजे – ते केवळ वास्तू नसून, एका क्रांतिकारक विचाराची भिंतीवर कोरलेली साक्ष आहे. राष्ट्रीय दर्जाचे हे स्मारक समाजमनात समतेचे, शिक्षणाचे आणि माणुसकीचे बीज रुजवणारा दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास उद्घाटक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात माळीनगर परिसराच्या नव्या ओळखीचा सोहळाही पार पडला. परिसरास आता “महात्मा फुले स्मारक वसाहत” हे नाव देण्यात आले असून, नामफलकाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.
महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजिलेल्या या कार्यक्रमात विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून आयु. बी. के. मसणे सर, आयु. हेमंत धानोरकर सर, आणि आयु. गोविंद जाधव सर यांनी महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर प्रभावी प्रकाश टाकला. त्यांचे विचार, सत्यशोधक आंदोलन, आणि स्त्रीशिक्षणासाठीचा लढा नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नदीप गोरे होते. उद्घाटक म्हणून डॉ. राजेश इंगोले तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे साहेब यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये अध्यक्ष आयु. रामेश्वर खाडे साहेब, आयु. गणेश राऊत, आयु. विजय कचरे, डॉ. किरण चक्रे, डॉ. अनिल नरसिंगे, डॉ. सुनील नरसिंगे, आयु . राजकुमार साळवी, गणेश कदम, आदित्य कदम, आयु. संजय साळवे, विदुलता गोरे, अरूण कदम, आयु. ओवाळ साहेब, डॉ. लोणारे सर, आयु लंकेश वैद्य सर आणि भगवानराव ढगे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. किरण चक्रे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आयु. आदित्य कदम यांनी पार पाडले, तर अंतःकरणपूर्वक आभारप्रदर्शन डॉ. मिलिंद ढगे यांनी केले.