अनैतिक संबंधातून भाजपा नेत्याची माजलगावात हत्या ?
बीड प्रतिनीधी: – माजलगाव जि.बीड येथील भारतीय जनता पक्षाचे वितारक बाबासाहेब आगे यांच्या प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत असून, सदरील घटना मंगळवार ता. 15 रोजी दु. अडीच वाजता घडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत होते.
दरम्यान, सदरील हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आगे यांच्यावर कोणत्या कारणांवरून हल्ला झाला, या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही. मंगळवारी दुपारी ते भाजपा कार्यालयात बसले असताना, मारेकऱ्यांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याचे समजते. घटनेने बीड जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.