परळी

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शनिवारी परळीत महत्त्वपूर्ण बैठक* *_खा.बजरंग बाप्पा सोनवणे व राजेंद्र मस्के यांची उपस्थिती; पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन_*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने परळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा, पक्षाच्या विविध आघाडीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी तथा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या अनुषंगाने शनिवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राजेभाऊ फड यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही बैठक सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या बैठकीस बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह मान्यवर नेतेमंडळींची उपस्थिती असणार आहे. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्या सर्वांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राजेभाऊ फड यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा केली जाणार असून, पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यासाठी पक्षाचे सर्व मार्गदर्शक नेतेमंडळी आढावा घेणार आहेत. या बैठकीस परळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाचे नेते राजेभाऊ फड यांच्यासह उत्तम दादा माने, मिनिनाथ दादा फड, देवराव महाराज लुगडे, बाबासाहेब शिंदे, जीवनराव देशमुख, एच.यू.फड, शंकर शेजुळ, वर्षाताई रायभोळे, कल्पनाताई देशमुख, रमेश ढाकणे, सोमनाथ भोसले, फिरोज सय्यद, कल्पनाताई देशमुख, मंगलताई सोळंके, अश्विनीताई सोळंके, दीपाली सावंत, अश्विनी सरवदे, हनुमंत फड, डॉ.जे.एन.शेख, गणेश देवकते, भीमराव हाके, प्रकाश राठोड, राजेश फड, शिवाजीराव नागरगोजे, शिवाजीराव लोमटे, भगवानराजे कदम, एकनाथ मुंडे, गोपाळराव सलगर, प्रकाश मुंडे, पप्पू गित्ते, समाधान मुंडे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!