बीडमध्ये हे काय सुरुय? 15 दिवसांत चौथा खून, आता चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला संपवलं…
केज प्रतिनीधी: – बीड जिल्हा पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरला आहे. आता चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. केज शहरात ही घटना घडली आहे. गेल्या 15 दिवसांत हा चौथा खून असून बीडमध्ये हे काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीला अक्षरशः उत आल्याचे पाहायला मिळत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज शहरात चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर केज शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली आहे. गेल्या 15 दिवसांत हा चौथा खून असून बीडमध्ये हे काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रेहान ला नाल्यात फेकले
रेहान कुरेशी आणि त्याच्या शेजारी राहाणाऱ्या चिकन विक्री करणाऱ्या दुसऱ्या अल्पवयीन मुलामध्ये वाद झाला. मात्र, हा वाद विकोपाला जाऊन आरोपीने रेहानला उचलून थेट सिमेंट काँक्रिटच्या नाल्यावर फेकलं. रेहानच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
नागरिका मध्ये पसरली भीती
गेल्या काही महिन्यांत बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खून, घरफोड्या, दरोडे, अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग, या सगळ्या घटनांनी जिल्ह्याच्या शांततेला सुरुंग लावला आहे. केजसारख्या तुलनेने छोट्या शहरांमध्येही आता दिवसाढवळ्या हत्या होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून केज शहरात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. रेहान कुरेशी असे मृत मुलाचे नाव असल्याचे समजते. या प्रकरणी केज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी देखील अल्पवयीन आहे. या घटनेमुळे बीडचा केजमध्ये खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.