*अंबाजोगाईचे भूमिपुत्र डॉ. संदेश सुराणा यांची द युरोलॉजी सोसायटी पुणे, च्या सचिव पदी निवड*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई शहरातील जेष्ठ पत्रकार स्वर्गीय लालचंद खुराणा व आदर्श शिक्षिका श्रीमती लिलाबाई सुराणा यांचे सुपुत्र सध्या पुणे येथे कार्यरत असणारे अंबाजोगाई शहराचे भूमिपुत्र डॉ. संदेश लालचंद सुराणा यांची द युरोलॉजी सोसायटी पुणे या संघटनेच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंबाजोगाई शहर हे नवरत्नांची खान आहे. या शहराने देशास अनेक दिग्गज विभूती दिल्या आहेत. यातच डॉ संदेश सुराणा यांची भर पडल्याने अंबाजोगाई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
द यूरोलॉजी सोसायटी पुणे ही मूत्रपिंड शल्य चिकित्सक यांची संघटना आहे. याद्वारे आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. नुकतीच या संघटनेची बैठक संपन्न होवून यामध्ये संघटनेच्या पुणे शहराच्या सचिवपदी डॉ. संदेश सुराणा यांची एकमताने बिनविरोध अशी निवड करण्यात आली. द यूरोलॉजी सोसायटी पुणे ही एक नामांकित ऑर्गनायझेशन आहे. पुणे शहरांमध्ये सर्व न्यूरोलॉजिस्ट म्हणजेच मूत्र विकार तज्ञ यांची ही संघटना आहे.
डॉ. संदेश सुराणा हे अंबाजोगाई शहरातील प्रख्यात पत्रकार स्व. लालचंद सुराणा व आदर्श शिक्षिका लीलाबाई सुराणा यांचे सुपुत्र आहेत.
द युरोलॉजी सोसायटी ही संघटना १९९२ साली स्थापन झाली आहे. या संस्थेची तथा संघटनेची पुण्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या तसेच शिक्षण पूर्ण होऊन मुत्र विकार क्षेत्रातील कार्य करत असलेल्या डॉक्टरांच्या अडीअडचणी तसेच रुग्णांच्या अडचणी विषयी वेळोवेळी विचारविनिमय केले जातात. संस्थेच्या प्रत्येक महिन्याच्या बैठकीमध्ये आपल्या ज्ञानाची दिवाण-घेवाण केली जाते तसेच नवनवीन माहितीवर चर्चा केली जाते.
मागील १० वर्षापासून डाॅ. संदेश सुराणा हे या संस्थेशी जोडले गेले आहेत. त्यांनी पहिल्यांदा कौन्सिल मेंबर नंतर खजिनदार म्हणून देखील या संस्थेत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पडली आहे. संघटनेत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची संघटनेचे सचिव या पदासाठी सर्वानुमते व बिनविरोध अशी निवड करण्यात आली आहे. डॉ. संदेश सुराणा हे पुण्यामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे वर्कशॉप घेऊन अनेक रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केल्या आहेत . आपले कौशल्य, ज्ञान आणि बुद्धिमत्तेचा वापर करून ते आज पुण्यासारख्या महानगरात यशस्वी डॉक्टर तथा एक यशस्वी न्यूरॉलॉजिस्ट म्हणून सुपरिचित झाले आहेत. ते पुना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच संजीवन हॉस्पिटल च्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहेत.