*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीम जन्मोत्सवाच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व अपंग बंधूना शिदा वाटप :-अर्जुन वाघमारे ता.प्रमुख शिंदे गट
अंबेजोगाई प्रतिनिधी:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त शिवसेना (शिंदे गट) यांच्या तर्फे जि.प.प्रा.शा.येल्डा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व अपंग बंधुना शिदा वाटप अर्जुन वाघमारे तालुका प्रमुखाच्या नेतृत्वा खाली शिंदे गटाच्या वतीने कार्यक्रम राबवण्यात आला
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांनी सकाळी 11 वाजता अंबेजोगाईत आंबेडकर चौकातील परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अर्जुन वाघमारे तालुका प्रमुख यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना भीम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने येल्डा परिसर दणाणून गेला होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूस आंबेडकरी अनुयायांच्या वतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोफत वही व पेन वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या उपक्रमातही अर्जुन वाघमारे,व यांच्या सहकार्याने राजेभाऊ लोमटे, गणेश जाधव, शहर प्रमुख तालुका संघटक बिटु चाटे उप ता प्रमुख दशरथ चाटे हनुमंत हावळे आयोजक उप ता प्रमुख गणेश देवकते सरकलं प्रमुख सतीष फुगणर मुख्याध्यापक विष्णु सरवदे सर सर्व शिक्षक व शिक्षिका सरपंच सोजरबाई व ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी सहभाग घेऊन आपल्या हाताने विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप केले. यावेळी यांसह पदाधिकारी व असंख्य अनुयायी उपस्थित होते.