सोमय्यांच्या तक्रारीनंतर बीड प्रशासन ॲक्शन मोडवर, परळीत 14 जणांवर गुन्हा दाखल
परळी प्रतिनिधी:-–
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या परळी येथे येऊन तहसीलदार नगर पालिका अधिकारी आणि पोलिस अधिकार्यांची भेट घेतली होती, तसेच तसे पुरावे सादर करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर बीडमधील प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. बीडच्या परळी शहरात बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी येथील शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमधील परळी शहर पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र काढणार्या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या परळी येथे येऊन तहसीलदार नगर पालिका अधिकारी आणि पोलिस अधिकार्यांची भेट घेतली होती, तसेच तसे पुरावे सादर करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.यानंतर तहसीलमधील कर्मचारी व्यंकट सुर्यवाड यांच्या फिर्यादीवरुन 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींनी जन्म आणि मत्यु प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही, तसेच परळी आणि सिरसाळा बाहेरील खोटे कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर करुन शासनाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय 2024-25 दरम्यान विलंबाने दिले गेलेले 1389 जन्म प्रमाणपत्राचे आदेशही तहसीलदारांनी रद्द केले, अशी माहिती संबंधित अधिकारी यांनी दिली आहे.
परळीत जन्म प्रमाणपत्रातही बोगसगिरी अढलून आल्याने ही प्रक्रिया सुरू झाली होती. यामध्ये बनावट पुराव्याच्या आधारे जन्म प्रमाणपत्र काढणार्या 14 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे, असे पोलिस अधिकारी यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्यांनी 10 हजारापेक्षा अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र काढल्याचा दावा करत किरीट सोमय्या यांनी केला होता. बीड जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणी याआधीही काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उचलून धरत सोमय्या परळीत दाखल झाले होते. तहसीलदारांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी थेट परळी पोलीस ठाणे गाठले आणि या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.