सनगावच्या सरपंचासह 10 साथीदाराची गावातील महिला वकिलास पाठीचे सालटे निघे पर्यंत बेदम मारहाण, तालुक्यात खळबळ
आंबजोगाई (प्रतिनिधी)
ध्वनी प्रदूषणा मूळे आवाज कमी करावा या मागणीची तक्रार केल्याच्या कारणास्तव संतापलेल्या गावच्या सरपंचासह 10 साथीदाराने आपल्याच गावातील महिला वकिलास बेदम मारहाण केल्याची घटना आंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे घडली.
या विषयी प्राप्त माहिती अशी कि, अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या व तालुक्यातील सनगाव येथील राहिवासी ऍड ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या महिला वकीलाने सनगाव गावात ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या, याचा राग मनात धरून याच गावचे सरपंच अंजान आणि त्याच्या 10 कार्यकर्त्यानी
ज्ञानेश्वरी ही तिचे अंबराईचे शेतात कै-या अनण्यासाठी जात असतांना आद्रकिचे शेतातील बांधचे जवळ गेली असता यातील आरोपी क्र. एक ते सहा यांनी त्याचे हातात काळ्या रबरी पाईप घेवुन व आरोपी क्र. सात ते नऊ हे हातात लाकडी काठ्या घेवुन तिच्या जवळ आले व तु या पुर्वी गावातील पिठाच्या गिरण्या व मंदिरावरिल भौग्याच्या तक्रारी का दिल्यास व तुझे आईची कोर्टात सुरु असलेली 307 ची केस का काढून घेत नाहीस व तु यापुढे आमचे विरुध्द तक्रार देशिल का असे म्हणुन त्याचे हातातील काठ्या व रबरी पाईपने फिर्यादीचे पाठीवर, मानेवर कमरेवर दोन्ही पायाचे पाठीमागील पायावर, शिटवर मारहान करुन गंभिर दुखापत केली. व आरोपी क्र. एक व तीन याने वाईट हेतुने तिच्या हाताला धरुन अंगास झोबाझोब करुन विनयभंग केला. आरोपी क्र. दहा याने तिला खलास करुन टाका असे म्हणुन आर्वाच भाषेत शिविगाळे केली तसेच तिचे चुलते योगीराज अंजान व चुलती अर्चना अंजान याना ही मारहान झाल्याचे वृत्त आहे.
या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आसुन सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे ? हा पुरुषार्थ आहे का ? या घटनेने सरपंचाच्या कारभारा विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणी युसूफ वडगाव पोलिसात अनंत रघुनाथ अंजान, २) सुधाकर रघुनाथ अंजान, ३) राजकुमार ज्ञानोबा मुंडे, ४) कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ५) ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, 6) नवनाथ ज्ञानोबा जाधव ७) मृत्युजय पांडुरंग अंजान 8) अंकुश बाबुराव अंजान 9) सुधीर राजाभाऊ मुंडे, 10) नवनाथ दगडु मोरे सर्व रा. सनगाव ता. अंबाजोगाई जि. बीड या 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ 590 सय्यद हे करत आहेत.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्यभामा सौंदर्मल यांनी या प्रकरणी समाज माध्यमावर पोस्ट केल्या नंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.