नाशिक

बापासमोरच २१ वर्षीय तरुणीला बिबट्याने नेलं ओढत

नाशिक प्रतिनीधी: —

नाशिकच्या दिंडोरी इथं २१ वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.वनारवाडीतल्या पायल चव्हाण या मुलीवर शेतात काम करताना बिबट्यानं हल्ला केला. पायलला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी धाव घेतली. पण तोपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला होता. वनारवाडीत या घटनेमुळे शोककळा पसरली असून भीतीचं वातावरणही आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक-दिंडोरी राज्य मार्गावर वनारवाडी इथं चव्हाण कुटुंबिय शेतात कामासाठी गेलं होतं. त्यावेळी मुलगी पायल ऊसाच्या शेताजवळ गवत कापत असताना अचानक मागून बिबट्या आला. बिबट्याने तिच्यावर झडप घातली आणि तिला फरफटत नेलं.मुलीचा आरडाओरडा ऐकून तिच्या वडिलांसह इतर लोकही धावले. दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत पायलला तिथं सोडून बिबट्या पळून गेला. यानंतर कुटुंबियांनी पायलला तातडीनं रुग्णलयात नेलं. दिंडोरी इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पायलचा मृत्यु झाल्याचं सांगितलं.

बिबट्याच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी वनविभागावर संताप व्यक्त केलाय. परिसरात बिबट्याचा वावर आहे अशा तक्रारीनंतरही कोणतीच कारवाई वनविभागाने केली नाही असा आरोप स्थानिकांनी केलाय.पोलिसांनी या घटनेनंतर पंचनामा केला असून वनविभाग अधिक तपास करत आहे. बिबट्याचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!