परळी

शिवराज दिवटे या युवकांस परळी नजिक टोकवाडी परिसरातील डोंगरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याची बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

 

स्व संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावर्ती टळली, शिवराजवर स्वा रा ती रुग्णालयात उपचारार्थ सुरु 

परळी प्रतिनिधी:–

परळी शहरा नजिक असलेल्या स्व. गोपीनाथ गडा जवळ असलेल्या लिंबोटा येथील राहिवासी शिवराज नारायण दिवटे या युवकांस टोकवाडी परिसरातील डोंगरात नेऊन आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एवढी बेदम मारहाण केली की या मारहाणीत स्व संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावर्ती होता होता टळली असून जखमी शिवराज यास स्वा रा ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्हा अनेक विविध कारणांनी सातत्याने सतत चर्चेत असून जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची चर्चा गरम असतानाच आज परळी शहरानजीक असलेल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे गडा नजीक असलेल्या लिंबोटा परिसरात मराठासेवक नारायण दिवटे पाटील याचा मुलगा शिवराज हा आज जलालपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता आसल्यामुळे महाप्रसाद घेण्यासाठी गेला आसता शिवराज नारायण दिवटे या युवकांवर मुली व महिलांना त्रास देण्यासाठी आल्याचा संशय व्यक्त करून गावकऱ्यांनी त्यास समज देण्याचा प्रयत्न केला असता काही वेळाने त्या भागात टोकवाडीतील नव्याने ऊदयास आलेली आठ ते दहा जनाच्या गॅगने शिवराज दिवटे नामक तरूणास रिलायन्स पेट्रोल पंप थर्मल पावर स्टेशन येथे गाठले व त्यास ऊचलुन नेहुन टोकवाडीतील रत्नेश्वर मंदिर येथील डोंगरावर झाडीत नेऊन रिंगण करून बेदम मारहाण केली. या मारहानीचा व्हिडीओ याच टोळक्याने केला असून रतनेश्वर मंदिर येथे एक लग्न आसल्यामुळे या परिसरात रहदारी होती व याच परिसरातील झाडी मधून रडण्याचा आवाज कोनाचा येतो आहे हे पहाण्यासाठी काही जण गेले आसताना हा प्रकार ऊघडकिस आला व त्या नंतर शिवराज यास उपचारार्थ स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुणालयात हालवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान या मारहाणीत स्व. संतोष देशमुख हत्याकांडची पुनरावर्ती होता होता टळली आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नसून या प्रकरणी पोलीस यंत्रनेची कार्यवाही सुरु असल्याचे वृत्त आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893840
error: Content is protected !!