*राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांची राजकिशोर मोदी यांच्या घरी सदिच्छा भेट**बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर अंबाजोगाई शहरात दादांची पहिलीच भेट*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा ना अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सोमवार दि 19 रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, प्रा. नानासाहेब गाठाळ, केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड, हारुन इनामदार, ऍड विष्णुपंत सोळंके, प्रा माणिकराव लोमटे, सतीश नाना लोमटे, मनोज लखेरा, संकेत मोदी, सुरेश मोदी, किशोर परदेशी , बबन लोमटे सुनील वाघाळकर, महादेव आदमाणे, अमोल लोमटे, दिनेश भराडीया, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यापासून अजितदादा यांचे अंबाजोगाई शहरात प्रथमच आगमन होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणून राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी देखील ही त्यांची पहिलीच भेट असल्याने मोदी परिवाराच्या वतीने देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले.
यावेळी अजितदादा पवार यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकिसाठी संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. अंबाजोगाई शहरातील नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडणूक आणता येतील यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आवाहन केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख म्हणून आमच्याकडून लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन देखील ना अजितदादा पवार यांनी मोदी निवास येथिल भेटीदरम्यान राजकिशोर मोदी यांना दिले.या भेटीत दादांनी बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई शहराचा विकास कसा करता येईल याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच यावेळी दादांना भेटायला आलेल्या अभ्यंगतांच्या विकासात्मक निवेदनांचा स्वीकार करत या सर्व निवेदनाबाबत आपण सकारात्मक विचार करू असेही आश्वासन यावेळी अजितदादा पवार यांनी निवेदनकर्त्याना दिले.