*भोगवटा धारकांना मालकी हक्क देऊन त्यांना न्याय मिळवून देणार:- राजकिशोर मोदी*
*अंबाजोगाई शहरातील भोगवटा धारकांच्या नोंदी मालकीमध्ये घेवून मालकीच्या पीटीआर देण्याच्या मागणीचे राजकिशोर मोदी यांचे जिल्हाधिकारी याना निवेदन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरात अनेक ठिकाणी नवीन वस्त्या त्याचबरोबर काही जागांवर अतिक्रमण करून अनेक वर्षे पासून शेकडो कुटुंब भोगवट्यामध्ये रहात आहेत. अशा कुटुंबाना मालकीमध्ये घेऊन त्यांना त्यांच्या मालकीच्या पिटीआर द्याव्यात अशी मागणी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. शहरातील विविध वस्त्यामधील भोगवटा धारकांना मालकीत घेऊन त्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देणार असल्याचे राजकिशोर मोदी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
वरील मागणीसाठी सादर केलेल्या निवेदनामध्येअंबाजोगाई नगर परिषद हद्दीतील असणाऱ्या लोक वस्त्यामधील अतिक्रमण धारकांच्या घरांच्या नोंदी भोगवटयामध्ये आहेत. ज्यामध्ये क्रांती नगर, लाल नगर, कबीर नगर, रायगड नगर, सिद्धार्थ नगर, मिलिंद नगर, गांधी नगर ,बोधी घाट, पेन्शन पुरा, सदर बाजार, समता नगर, भीम नगर, दमदम पुरा, शाह बट्टा, गवळी पुरा या अशा इतर वस्त्या गेल्या अनेक वर्षापासून वसलेल्या आहेत. तेथे हजारो कुटुंब आपल्या कुटुंबियांसह वास्तव करत आहेत.
२००९ साली महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून सदरच्या अतिक्रमण धारकांच्या भोगवट्यातील नोंदी मालकीत घ्याव्यात असा स्पष्ट उल्लेख केला आहे. मात्र भूमी अभिलेख खात्याच्या धोरणामुळे आजपर्यंत यात यश मिळू शकले नाही. मात्र याच परिपत्रकाच्या आधारे गेवराई नगर परिषदेने भोगवटा धारकांना मालकीच्या पीटीआर दिल्या आहेत.
त्याच पध्दतीने अंबाजोगाई नगर परिषदेने देखील येथील हजारो भोगवटा धारकांना त्यांच्या मालकीच्या जागेत घेऊन त्यांना त्यांच्या मालकीच्या पी टी आर द्याव्यात जेणे करून त्यांना शासनाच्या पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास घरकुल योजना व अन्य शासकीय योजनांचा लाभ घेता येईल अशी मागणी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर राजकिशोर मोदी, आदमाने महादेव , खालेद चाउस, गणेश मसणे, सुनील वाघाळकर, खयामोद्दीन काझी, किशोर परदेशी,कमलाकर हेडे, धम्मा सरवदे, दत्ता सरवदे, आकाश कऱ्हाड, गोविंद पोतंगले, रफीक गवळी, असलम शेख, शरद काळे,अकबर पठाण, मुन्ना वेडे, दत्ता हिरवे,संतोष चिमणे,अक्षय परदेशी आशिष ढेले, तौसिफ सिद्दीकी, यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.