श्री. योगेश्वरी देवल कमिटीच्याचे भाविक भक्तांना सुविधा-मंदिर परिसर विकास आणि जिर्णोद्धारासाठी प्रयत्न सुरू–पत्रकार परिषदेत विश्वस्त मंडळाची माहिती
अंबाजोगाई / प्रतिनिधी
श्री. योगेश्वरी देवल कमिटीच्या नविन विश्वस्त मंडळाने अल्पावधीतच पारदर्शक कारभारातून भाविक भक्तांचा विश्वास संपादन केला. विविध उपक्रम राबवून भाविक भक्तांची मने जिंकली. अशी माहिती नविन विश्वस्त मंडळाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या वेळी पत्रकार परिषदेतून विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, मा.धर्मादाय आयुक्त, लातूर यांच्या अदेशानुसार २०२४ साली मा. धर्मादाय आयुक्त बीड यांनी शासनाच्या सर्व नियम व अटींच्या अधिन राहून दिनांक ०१/०७/२०२४ रोजी श्री. योगेश्वरी देवल कमिटीच्या नविन विश्वस्त मंडळाची निवड केली. सर्व नवनिर्वाचीत विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची देवल कमिटीचे पदसिध्द अध्यक्ष तहसिलदार श्री. विलास तरंगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीत अंबाजोगाई शहराचे आराध्य, ग्रामदैवत माता श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या उपाध्यक्षपदी अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी तर सचिवपदी प्रा. अशोक लोमटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सहसचिवपदी संजय भोसले तसेच कोषाध्यक्षपदी शिरीष पांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे यांनी त्यावेळी जाहीर केले.
निवडी जाहीर केल्यानंतर तहसीलदार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना ‘मी आई श्री योगेश्वरी जगदंबेची शपथ घेतो की, आम्ही श्री योगेश्वरी देवी मंदिर विश्वस्त न्यासाचा व देवी भक्तांच्या हिताचेच निर्णय घेऊ, सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शी ठेवू, त्याचबरोबर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आग्रही व प्रयत्नशील राहू’ अशी शपथ दिली. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाची पहिली बैठक होऊन त्या बैठकीत दिनांक १८/०७/२०२४ पासून मातेच्या महाआरतीनंतर दुपारी १२ ते दुपारी २ या वेळेत (अन्नछत्र) महाप्रसाद सुरू करण्याचा ऐतिहासीक असा पहिला ठराव घेण्यात आला. सदरील महाप्रसाद त्या दिवसापासून आजतागायत दररोज चालु आसून अंदाजे ७०० ते ८०० भक्त याचा लाभा घेतात दुसऱ्या ठरावात मंदीराचे दैनंदिन व्यवस्थापन चांगले रितीने चालविण्यासाठी मंदीराचे उत्पन्न वाढविण्यासाठी सकाळी पैठणीसह देवीची प्रथम महापुजा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रथम महापुजेस येणाऱ्या दोन व्यक्तीस रू.१०००/- रु ची अभिषेक करण्याची पावती करून प्रथम महापुजा करता येईल. यामध्ये पैठणी (आवश्यक) यामुळे मंदीराचे मासिक उत्पन्न रू.६२०००/-वाढले. मंदीरात होणारे देवीचे अभिषेक हे देवल कमेटीस कळवून व रितसर पावती घेवूनच करावे असा ठराव घेण्यात आला. मंदीरात या अगोदर होणाऱ्या अभिषेक किंवा पुजेची नोंद आल्प प्रमाणात होत होती. हा ठराव मंदीरात पुजा विधी करणाऱ्या ब्राम्हणवृंदांनी देखील मोठ्या मनाने मान्य केला. यामुळे देखील मंदीराच्या मासिक उत्पन्नात रू.१५,०००/- ते २०,०००/-वाढ झाली. तसेच सर्व ब्रम्हवंदाना अभिषेक वाटून आले. पुर्वी एकाच ब्राम्हणाकडून अभिषेक करुन घेतले जात. दररोज रू.५०/- प्रति अभिषेक याप्रमाणे २५ ते ३० अभिषेक दैनंदिन होत असतात. आज मितीस देवस्थानास जवळपास नगदी रोख बँक खात्यात जमा शिल्लक, सोने-चांदीच्या दागीन्यांपासुन अंदाजे रू.१ कोटी रूपये उत्पन्न जमा आहे. यापूर्वी सकाळच्या प्रसादात दररोज फक्त खिचडी/शिरा वाटप होत होते. त्याचा मासिक खर्च १ लाक्ष रूपये होता असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र नवीन विश्वस्त मंडळाने महाप्रसाद, अन्नछत्र सुरू केल्यापासुन अंदाजे ३लक्ष रुपये रक्कमेचा खर्च होत आहे (त्याची सर्व बिले आपणांकडे आहेत) अन्नछत्रामुळे दर्शनासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या भक्तांची व गावातील भक्तांची सोय झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंदाजे १० ते १२ वर्षांपासून सौरऊर्जा प्रकल्प नादुरुस्त आवस्थेत पडला होता तो दुरूस्तीसाठी ठराव घेऊन रीतसर नियमाप्रमाणे कोटेशन मागवून घेवून त्या दुरूस्त करून घेण्यात आला. त्यामुळे त्याच रक्कमे मध्ये बंद पडलेल्या सोलार सिस्टीमची दुरुस्ती करून घेतली. ज्यामुळे मंदीराचे एमएसईबीचे वीज बील शुन्यापर्यंत आणण्यात नवीन विश्वस्त मंडळाला यश आलेले आहे. यामुळे मंदीराच्या मासिक खर्चातून रू. २५ ते ३० हजार रूपयांची बचत होऊन तेवढ्या रकमेचे मंदिराचे उत्पन्न वाढणार आहे. मंदीराच्या स्वच्छतेकडे जातीने लक्ष देऊन मंदीराचा कोपरा न कोपरा दररोज स्वतः लक्ष देऊन स्वच्छ केल्या जात आहे. यामुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेला भाविक मंदीरात थोडा वेळ शांत बसून आत्मिक शांततेचा व समाधानाचा अनुभव घेत आहे. दर दोन तासाला मंदीर परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. गेली २० वर्षांपासून ठेवी (फिक्स डिपॉझिट) पावत्या रिन्युअल केल्या नाहीत. त्यामुळे सदर रक्कम ही रिझर्व्ह बँकेत जमा आहे. ती रक्कम परत मंदिरास मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत सदरील रक्कम अंदाचे १ कोटीच्या असपास आहे.

संबंधित ट्रस्टला आयकर विभागाचा दंड भरावा लागल्यामुळे तहसीलदार साहेब यांनी मागील ट्रस्टच्या अव्यवस्थित कार्याभाराबाबत माजी सचिव व पदाधिकारी यांना यापूर्वी २ वेळा कारणे दाखवा व व्ययक्तिक कायदेशिर कार्यवाही नोटीस बजावली आहे. मागील कमेटीवर नाराजी व्यक्त केली आहे.
नवीन आर्थिक वर्षांत सर्व कार्यालयीन कारभार हा संगणकीकृत करण्यात आलेला आहे. देणगीदार, भाविक, भक्त तसेच इतर ही बाबींसाठी आवश्यक सर्व पावत्या संगणकीकृत देण्यात येत आहेत. आज पर्यंत शासनस्तरावर मंदीराची नोंद कुठेच व कोणत्याच वर्गात करण्यात आली नव्हती. आगामी काळात शासनाच्या तीर्थक्षेत्र तथा पर्यटन विभागाकडे (वर्ग-१) मंदिराची नोंद करून घेण्यासाठी नवीन विश्वस्त मंडळी प्रयत्नशील असणार आहे. पर्यटन महाराष्ट्र शासनाच्या वतीने २ कोटींचा निधी माजी आमदार पृथ्वीराज साठे, उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, तहसिलदार विलास तरंगे साहेब यांनी पाठपुरावा व प्रयत्न करून मिळविला आहे. या निधीतून पालखी मार्ग, पार्कींग, गेट इत्यादी गोष्टी करण्याच्या मानस आहे. यानंतर विकासआरखडा तयार करुन एकुण प्रकल्प अंदाजित ४० ते ५० कोटींचा प्रकल्प राबविण्याचा मानस मंदिर प्रशासनाचा आहे. सदरील प्रकल्प आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सदरील कार्य मोठे आहे. पण, श्री योगेश्वरी देवीचे भाविक, भक्त आणि तमाम अंबाजोगाईकरांनी आमच्यावर वेळोवेळी जो विश्वास व्यक्त केला आहे. त्या विश्वासाला आम्ही सर्व नवीन विश्वस्त तडा जाऊ देणार नाही. अंबाजोगाई शहर हे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जावे व त्या माध्यमातून शहरातील व्यापार, रोजगार वाढावा यासाठी नविन विश्वस्त मंडळ आगामी काळात ही प्रयत्नशील राहणार आहे. तसेच आगामी काळात मंदीर विकास कामाचा पुढील ३० वर्षांसाठीचा रूपये १०० कोटींचा मास्टर प्लॅन आराखडा तयार करण्याचे काम वास्तू विशारद आकाश कन्हाड यांच्या सल्यानुसार सुरू असून, त्यासाठी देवल विश्वस्त मंडळाच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.
हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो व त्या आदेशाचा मान राखतो सदरील आदेशात २०२४ ला आलेल्या नविन कमिटी बाबत कोणतीही टीका टिपणी केलेली नाही उलट २०१६ ची ज्या मागील कमेटीने घटना बनवली ती घटना रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे २०१६ ला असलेल्या कमिटीवर त्याचा रोष जातो. सदरील २०१६ ची घटना ज्यांनी सादर केली त्या घटनेत पुजाऱ्याचे हक्क डावलले गेलेले आहेत पुजारी पण २०१६ च्या घटने विरोधात कोर्टात गेलेले होते. त्यांचे हक्क संबंधी विचार व्हावा असे कोर्टाने आदेशित केलेले आहे आम्ही सनदशीर मार्गाने मंदिराचा कार्यभार करत आहोत. याबाबत अनेक भक्तांनी आपले मत नोंदवलेले आहे. गेल्या पन्नास वर्षापासून चालत असलेल्या कमिटीनेच २०२३ पर्यंत कामकाज केलेले होते. त्यांनीच २०१६ ची पण घटना केलेली होती त्या घटनेवरच कोर्टाने आक्षेप घेऊन सदरील घटना रद्द केलेली आहे
अशी माहिती श्री योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, सचिव प्रा. अशोक लोमटे, सहसचिव संजय भोसले, कोषाध्यक्ष शिरीष पांडे, विश्वस्त माजी आमदार पृथ्वीराज साठे, सतीश लोमटे, राजाभाऊ लोमटे, अमोल लोमटे, राजपाल भोसले, प्रविण दामा, अजित चव्हाण, रवी कदम, हंसराज देशमुख आणि श्रीमती संध्या मोहिते यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.