अंबाजोगाई

विद्युत सुरक्षा जनजागृती अभियान शून्य अपघात महावितरणचे ध्येय:-संदीप चाटे प्र. कार्यकारी अभियंता”*

*”विद्युत साधने हाताळताना महिलांनी,बालकांनी,शेतकरी बांधवांनी सर्व ग्राहकांनी काळजी घ्यावी:- सतीश कानडे उपकार्यकारी अभियंता”*

 

अंबाजोगाई प्रतिनिधी:–

अंबाजोगाई येथे महावितरण तर्फे विद्युत सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आले.

या अभियानात उपकार्यकारी अभियंता सतीश कानडे सर यांनी विद्युत अपघात टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबद्दल जनजागृती करताना १)मुलांनी खेळ ,पतंग, क्रिकेट खेळताना विजेच्या पोल,ताण तार, वाहिनीची तार, पासून लांब खेळावेत.२) घराच्या छतावर गच्चीवर वावरत असताना जवळून विद्युत वाहिनी गेलेली असल्यास लोखंडी सळई राॅड, ओल्या काठीने स्पर्श करू नये अथवा त्याच्या जवळ जाऊ नये.३) ओल्या हातांनी किंवा पायाने विद्युत उपकरण वापरू नका ४) ओलीत किंवा भिजलेल्या भागात विद्युत वापर टाळावा.५) पाण्यात उभे राहून विद्युत मोटार सुरू करू नये तसेच शेतातील मोटार व घरातील उपकरणे यांना योग्य ती आर्थिंग करावी ६) वीज चोरी करू नये आकोडे जिवंत तारेवर टाकल्यास प्राणांकित अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशा प्रकारचे जनजागृती अभियान अंबाजोगाई उपविभागातर्फे योगेश्वरी देवी परिसर, मंडई परिसर व ज्या ठिकाणी जास्त लोकांची वर्दळ असते अशा ठिकाणी लहान मुले,महिला, युवक यांना विद्युत जनजागृती अभियानाबद्दल सांगण्यात आले या अभियानात उपकार्यकारी अभियंता सतीश कानडे साहेब, गुणवत्तानियंत्रक अभियंता अशोक चाटे सर,सहाय्यक अभियंता सतीश जाधव सर, लेखा विभागाचे किशोर ढगे सर,तांत्रिक विभागाचे हनुमंत जगताप सर,शोएब पठाण सर,इस्लाम पठाण सर व इतर कर्मचारी या अभियानात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893837
error: Content is protected !!