घरासमोर उभी कार चोरट्यांनी केली लंपास…..
अंबाजोगाई प्रतिनिधी :
शहरातील क्रांतीनगर परिसरातील घरासमोर लावलेली स्विफ्ट डिझायर कार अज्ञात चोरट्यांनी मंगळवार रोजी रात्री आठच्या सुमारास लंपास केल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाभरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अंबाजोगाई शहरातील अमर अर्जुन वाघमारे (वय २८) रा. क्रांतीनगर यांच्या घरासमोर लावलेली स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एमएच ०२ इआर ५७३३ अंदाजे किंमत ४ लाखांची कार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शुक्रवार (दि. ६) अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.