*सोन्याचे दुकाणातुन चैन चोरणाऱ्या महीलांची टोळी जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
बीड प्रतिनिधी:–
दिनांक 17.06.2025 रोजी कुंदन बालासाहेब जोगदंड, वय 23 वर्ष, रा कानडी रोड, केज यांनी पोलीस ठाणे केज येथे फिर्याद दिली की, त्याचे स्वत:चे श्री ज्वेलर्स नामक दुकाणामध्ये अज्ञात चार महीलांनी गिऱ्हाईक म्हणुन येऊन पायातील चांदीची चैन विकत घ्यायची आहे दाखवा असे म्हणुन बऱ्याच चांदीच्या चैन पाहील्या व फिर्यादीची नजर चुकवुन चांदीच्या चैन चोरुन नेल्यावरुन त्याचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे केज येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक बीड यांनी सदरील गुन्हा उघडकीस आनण्याचे सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आनण्याचे प्रयत्न सुरु केले असता दिनांक 17.06.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, चोरीस गेलेला चांदीचे चैन जोड चोरलेल्या महील्या हया चांदीच्या चैन विक्री करण्यासाठी कोठे तरी जात असुन सध्या बसची वाट पाहत नगर नाका, नगर रोड, बीड येथे उभ्या आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच सदर ठिकाणी जावुन छापा मारुन 1) सुमन पोपट येडवे, वय 52 वर्ष, 2.कलावती मोतीरामकेंगार, वय 56 वर्ष, 3.बबीता भाऊराव केंगार, वय 61 वर्ष, 4.व्दारकाबाई सतीष बोराडे, वय 40 वर्ष, सर्व रा.मुर्शदपुर ता.जि.बीड यांना ताब्यात घेतले व त्याचे कडे असलेल्या पर्समध्ये पाहीले असता पर्समध्ये चोरीस गेलेले चांदीचे चैन दिसुन आल्या. त्यांनी सदरील चैन केज येथील सोन्याचे दुकाणामधुन चोरल्याचे कबुल केले. त्याचे कडुन चोरीस गेलेले चांदीचे चैन जप्त करुन महीला आरोपी व चांदीचे चैन पुढील तपासकामी पोलीस ठाणे केज यांचे ताब्यात दिले आहेत.
सदरील कारवाई श्री नवनित काँवत, पोलीस अधीक्षक,बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक,बीड , श्री शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारोती कांबळे, विकास राठोड, विष्णु सानप, सचिन आंधळे, महीला पोलीस स्वाती मुंडे, चालक नितीन वडमारे यांनी केली आहे.