महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात….

कसारा:- – शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशन च्या हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना वाशिंद आणि आमने दरम्यान पहाटेच्या ४ वाजून ५८  मिनिटांच्या  सुमारास घडली.

                  अब्दुल पाशा शेख (वय 65) आणि जाहीद सिद्दिकी (वय ४०) अशी मयत प्रवाशांचे नाव  आहे. अपघातग्रस्तांमध्ये २ लहान मुले, ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश असून त्यातील दोन ते तीन जणांन जास्त मार  असल्याचे भिवंडीतील इंदिरा गांधी  रुग्णालयातून  सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सविस्तर वृत्ती असे कि, समृद्धी महामार्ग किलो मिटर क्रमांक ६९० या ठिकाणी कमी वेगात एक कटेनर मुंबई कडे जातं होता याच दरम्यान नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून  भिवंडी कडे भरधाव वेगात  निघालेल्या क्रूझर गाडीचा चालक मारुती गुंजाळ याचे गाडी वरील नियंत्र सुटले व गाडी थेट पुढे चाललेल्या कटेनर वर जाऊन धडकली या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले तर चालकासाह ६जण जखमी झाले . अपघाता ची माहिती मिळताच  समृद्धी महामार्गवरील शासकीय रुग्णवहीका, महामार्ग पोलीस शहापूर  च्या प्रभारी अधिकारी छाया कांबळे यांनी आपले कर्मचारी पाठवून आपघात ग्रस्त   जखमींना रुग्णवाहिकेतून  तात्काळ भिवंडी  उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . मात्र गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.दरम्यान, मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी  शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी करीत आहेत.

डुलकी लागल्याने आपघात 

दरम्यान  पहातेच्या सुमारास कोसळणाऱ्या पावसात अति वेगात असलेल्या  क्रूजर गाडीचा  वाहन चालक मारुती गुंजाळ याला डुलकी लागल्याने हा आपघात झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893840
error: Content is protected !!