Dindrud

धनुकेश्‍वर मल्टीस्टेटकडून १२ लाखांची फसवणूक..

दिंद्रुड प्रतिनिधी :– माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील धनुकेश्‍वर मल्टीस्टेटमध्येही फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका खातेदाराचे १२ लाख रूपये या मल्टीस्टेटमध्ये अडकून पडले आहेत . मल्टीस्टेट पैसे देत नसल्याने खातेदाराने थेट अध्यक्षासह इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अजून काही लोकांचे अध्यक्ष शिवहरी अशोक यादव, उपाध्यक्ष सचिन पांडूरंग रोडगे, सचिव रामेश्‍वर धर्मराज तांदळे, मुख्य शाखा प्रमुख पांडुरंग सुदाम तांदळे, दिंद्रुड शाखा अधिकारी ज्ञानेश्‍वर सुदाम यादव त्यानी जनतेची फसवणूक करण्यात आलेली आहेत त्यामुळे यांच्यावर अजून गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेटने खातेदारांची वाट लावून ठेवली आहे . खातेदारांचे लाखो रूपये मल्टीस्टेटमध्ये अडकून पडलेले आहेत. पंढरी किसन केकान (वय ७५) रा.चाटगाव ता.धारूर यांनी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील धनुकेश्‍वर मल्टीस्टेटमध्ये १२ लाख रूपये ठेवले होते. त्यांना १२.०५  टक्के व्याजदराचे आमिष दाखविण्यात आले होते. विशिष्ट कालावधीसाठी केकान यांनी या मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवले होते. कालावधी संपल्यानंतर ते पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना मल्टीस्टेटकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जावू लागली. आपली यामध्ये फसवणूक झाल्याचे केकान यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुरुवार (दि.१९) रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार मल्टीस्टचे अध्यक्ष शिवहरी अशोक यादव, उपाध्यक्ष सचिन पांडूरंग रोडगे, सचिव रामेश्‍वर धर्मराज तांदळे, मुख्य शाखा प्रमुख पांडुरंग सुदाम तांदळे, दिंद्रुड शाखा अधिकारी ज्ञानेश्‍वर सुदाम यादव या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893841
error: Content is protected !!