अंबाजोगाई

पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी आपला मोर्चा मुख्य बाजारपेठेत वळवल्याने अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचे धाबे दनाणले.

आंबजोगाई (प्रतिनिधी)

    मुख्यरस्त्यावरील अतिक्रमण धारकांना चाप बसवल्या नंतर आंबजोगाई पो स्टेचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी आज आपला मोर्चा मुख्य बाजार पेठेत वळवळ्याने अतिक्रमन धारक व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दनाणले.

       अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी शरद जोगदंड यांनी पदभार स्वीकारला नंतर शहराची मुख्य समस्या असलेल्या व विस्कटलेल्या वाहतूक व्यवस्थेवर आपले लक्ष केंद्रित केले असून आठ दहा दिवसापूर्वी शरद जोगदंड यांनी मुख्य वाहतुकीची समस्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य वाहतुकीची समस्या असलेल्या रस्त्यावर स्वतः आपल्या ताफ्या सह उतरून रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना प्राथमिक सूचना देऊन एक प्रकारचा सज्जड दम दिला त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे सुधारण्यास मदत झाली आहे. 

      अंबाजोगाई बस स्थानक परिसरातील व्यवस्था सतत सुरळीत राहावी यासाठी बस स्थानकाच्या रिक्षाबंधन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी रोटरी क्लबच्या सहकार्याने एक पोलीस चौकीही उभारण्यात आली असल्याने वाहतूक पोलिसांसाठी सोयीचे झाले आहे.

      अंबाजोगाई शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते योगेश्वरी मंदिर व पुढे पाटील चौक यादरम्यानच्या सर्व व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानासमोर किमान पाच फुटापुढे विक्री करण्याच्या वस्तू ठेवून अतिक्रमण करण्याची स्पर्धा चालवली असून या अतिक्रमणामुळे पादचारी व्यक्ती व वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. या संदर्भात वारंवार नागरिकांच्या तक्रारी असताना नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत होता. 

     वास्तविक बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्याचे काम हे अंबाजोगाई नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे असतानाही या कामाची जबाबदारी स्वतः खांद्यावर घेऊन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी आपले सहकारी सहा पो निरीक्षक कांबळे, पो उ नी पवार, दौंड, शिंदे यांच्यासह जवळपास 40 ते 50 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन आपला मोर्चा मुख्य बाजारपेठेत वळवला. यावेळी या पथकाने सर्व व्यापाऱ्यांना आपापल्या दुकानासमोरील अतिक्रमण करून ठेवलेल्या वस्तू काढून घेण्यासंदर्भात प्राथमिक सूचना दिली असून या वस्तू काढून न घेतल्यास भविष्यात कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा सज्जड दमही त्यांना देण्यात आला आहे.

     एकिकडे या कार्यवाहीने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असताना दुसरीकडे मात्र नागरिकांमधून पोलीस निरीक्षक शरद जोगदंड सपने न्यानेश्वर कांबळे, पी.एस.आय रवी कुमार पवार, पी.एस.आय शिंदे, पोलीस कर्मचारी संतोष बदने,हनुमंत चांदर, भागवत नागरगोजे, प्रवीण कुमार गीते, बदाम आरसूळ, महिला कर्मचारी, सविता कराड, सुचिता केदार होमगार्ड हजर होते त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893839
error: Content is protected !!