बीड येथील क्लासेस मध्ये घडलेल्या प्रसंगानंतर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांची टीम अंबाजोगाई शहरात अलर्ट मोडवर, सर्व क्लासेस चालकांची बैठक घेऊन दिल्या सक्त सूचना..
अंबाजोगाई ( प्रतिनिधी )
बीड येथील उमाकिरण कोचिंग क्लासेस मध्ये एका अल्पवयीन युवतीवर घडलेल्या प्रसंगाचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांची टीम अलर्ट मोडवर आली असून अंबाजोगाई शहरातील क्लासेस मध्ये अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जोगदंड यांनी सर्व क्लासेस चालकांची एक बैठक घेऊन सक्त स्वरूपाच्या सूचना त्यांना दिले असून अठरा वर्षाच्या खालील मुला मुलींना वाहन चालवण्यास दिल्यास त्यांच्या पालकावर कायदेशीर कार्यवाही करण्याची तंबी त्यांनी या बैठकीत दिली आहे.
सध्या कोचींग क्लासेस, स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्र, मुला-मुलींचे वस्तीगृह मध्ये व परिसरामध्ये मुलींच्या छेडछाडीच्या व अत्याचाराचा घटना घडत आहेत. तशा घटना अंबाजोगाई शहरात घडु नयेत या साठी मा.पोलीस अधिक्षक श्री नवनीत कावत सर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक तिडके मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर चे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या सूचनेनुसार शहरातील YPC क्लासेस आनंदनगर येथे कोचींग क्लासेस, स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्र, मुला-मुलींचे वस्तीगृह यांचे संचालक यांची व्यापक बैठक घेण्यात आली. बैठकीत मुला-मुलींचे सुरक्षेच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या ज्यामध्ये सर्व क्लासेस, अभ्यासिका केंद्र, वस्तीगृह व परिसरात CCTV कैमेरे बसवण्यात यावे, अशा सर्व ठिकाणी तक्रार पेटी बसवण्यात यावी, सर्वांनी तक्रार रजिस्टर ठेवावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमला जावा, सर्वांनी आपापल्या क्लासेस अभ्यासिका केंद्र व वस्तीग्रह परिसरात येणाऱ्या साठी पार्कीगची व्यवस्था करावी. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तयार करावे. वय 18 पेक्षा कमी असलेल्या मुला-मुलींना मोटार सायकल, स्कुटी घेवुन येवु नये या बाबत त्यांच्या पालकांना सुचना देण्यात याव्यात.
या बैठकीस एकुण 45 क्लासेस, स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्र, वस्तीगृह यांचे संचालक व शहर पोलीस स्टेशनचे पोहे को संतोष बदने असे हजर होते.
यावेळी सुचना देवूनही 18 वर्षा खालील मुला-मुलींना मोटार सायकल/ स्कुटी चालवण्यास देणाऱ्या पालकांवर मोटार वाहन कायदा अन्वये कार्यवाही करण्यात येईल. तसेच क्लासेस व शाळा, कॉलेज परिसरात फिरणाऱ्या टवाळखोर मुलांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे अवाहन पोलीस स्टेशनं अंबाजोगाई शहर च्या वतीने करण्यात आले आहे.