कार उलटून एक ठार तर पाच जखमी..
अंबाजोगाई प्रतिनिधी :-
अंबाजोगाई तालुक्यातील उजनी येथील शाळेतील शिकणारे सहा वर्गमित्र कारमधून तुळजापूर येथे दर्शनाला जात असतांना औसा तुळजापूर महामार्गावर शिंदाळा (लो) गावाजवळ झालेल्या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला आहे तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना शनिवारी (ता. ५) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी संरक्षक बॅरिगेट तोडून सर्विस रोडवर पलट्या खाल्ल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे.
मयत व्यक्ती कार्तिक गायकवाड
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील सहा शाळकरी तरुण शनिवार( ता. ५) जुलै रोजी (एम एच ४६ एपी १२१०) या कारनेया भीषण अपघातात कार्तिक किरण गायकवाड (वय-२२, रा. उजनी, ता. अंबाजोगाई) याचा जागीच मृत्यू झाला आहे तर ओमकार सुदर्शन गिरी (वय-१७, रा. उजनी, ता. अंबाजोगाई), शिवम नारायण गुट्टे (वय-२०, रा. खापरडोंग, ता. अंबाजोगाई), रोहन विजय कांगणे (वय-२२, रा. कांगणेवाडी, ता. अंबाजोगाई) किरण पाटलोबा कांगणे (वय-२०, रा. कांगणेवाडी, ता. अंबाजोगाई) राजेश शाम भारती (वय-१९, रा. उजनी ता. अंबाजोगाई) हे गंभीर जखमी झाले आहेत.